शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

इम्रान खानचा शपथविधी १४ आॅगस्टपूर्वी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 02:21 IST

पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळाले नसले तरी सर्वाधिक जागा मिळालेल्या ‘पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ’ (पीटीआय) पक्षाने बहुमताचे गणित जुळविण्यासाठी अपक्ष व अन्य छोट्या पक्षांशी बोलणी सुरु केली आहेत.

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळाले नसले तरी सर्वाधिक जागा मिळालेल्या ‘पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ’ (पीटीआय) पक्षाने बहुमताचे गणित जुळविण्यासाठी अपक्ष व अन्य छोट्या पक्षांशी बोलणी सुरु केली आहेत. १४ आॅगस्ट या पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारचा नक्की शपथविधी होईल, असा विश्वास ‘पीटीआय’ पक्षाने व्यक्त केला.आम्हाला बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ नक्की मिळेल व स्वातंत्र्यदिनाच्या आधी देशाला नवे सरकार मिळेल, असे ‘पीटीआय’चे प्रवक्ते नईनूल हक यांनी ठामपणे जाहीर केले. मात्र नेमका कोणाकडून पाठिंबा अपेक्षित आहे व हे पाठिंबा देणारे सरकारमध्ये सामिल होणार की बाहेरून पाठिंबा देणार, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. दोन-चार दिवसांत सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे ते म्हणाले.इकडे इम्रान खान यांच्या बाजूने सरकार स्थापनेची तयारी सुरु असताना अनुक्रमे ६४ व ४३ जागा मिळून दारुण पराभव झालेले नवाज शरीफ यांची मुस्लिम लीग व आसिफ अली झरदारी यांचा ‘पीपीपी’ पक्ष विरोधी पक्ष म्हणून नेमकी कोणती भूमिका घ्यायची या संभ्रमात आहे. निवडणुकीत ‘रिगिंग’ झाल्याचा आरोप करून १२ पक्षांनी फेरनिवडणुकीची मागणी केली. त्या संयुक्त बैठकीला हे दोन पक्ष हजर होते. परंतु त्यातील काही पक्षांनी सदस्यत्वाची शपथ न घेता संसदेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. परंतु या टोकापर्यंत जायचे की नाही हे मुस्लिम लीग व पीपीपीचे अद्याप ठरलेले नाही. (वृत्तसंस्था)बहुमतासाठी १६ जागा कमी२७० जागांपैकी ‘पीटीआय’ पक्षाला ११६ जागा मिळाल्या. बहुमतासाठी १६ जागा कमी आहेत. पक्षाला बहुमताची जुळणी करताना याहून अधिक जागांचे गणित करावे लागणार आहे. याचे कारण असे की, स्वत: इम्रान खान पाच मतदारसंघांतून व इतर काही उमेदवार एकाहून अधिक ठिकाणहून निवडून आले आहेत. शपथ घेण्यापूर्वी त्यांना एक सोडून बाकीच्या जागांचा राजीनामा द्यावा लागेल.कराचीमध्ये सापडल्या रिकाम्या मतपेट्याकराची आणि सियालकोट शहरात रस्त्याच्या कडेला पाच रिकाम्या मतपेट्या आणि डझनपेक्षा जास्त मतपत्रिका सापडल्यामुळे निवडणूक खुल्या आणि न्याय वातावरणात झाल्याच्या निवडणूक आयोगाच्या दाव्याबद्दल संशय व्यक्त होत आहे.युरोपियन युनियनच्या तुकडीने २५ जुलै रोजी झालेल्या या निवडणुकीचे निरीक्षक म्हणून काम पूर्ण केले, परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंध व उमेदवारांना प्रचारासाठी न मिळालेल्या समान संधीने ही निवडणूक ओळखली जाईल.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान