शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातील नेत्यांना आता 'साध्या राहणी'ची सक्ती; प्रथमवर्ग प्रवासाला बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 15:36 IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या राखीव अधिकारांचा उपयोग करत 51 अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च केले होते.

इस्लामाबाद- पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधानइम्रान खान व त्यांच्या मंत्रिमंडळाने राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, सरन्यायाधीश, सिनेटचे अध्यक्ष, नॅशनल असेम्ब्लीचे अध्यक्ष यांनी हवाई प्रवास करताना प्रथम वर्गातून प्रवास करु नये असा निर्णय घेतला आहे. याबरोबरच इम्रान यांच्या मंत्रिमंडळाने देशातील कार्यालयीन वेळाही बदलल्या आहेत. खान यांच्या मंत्रिमंडऴाच्या दुसऱ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना केवळ देशांतर्गत प्रवासासाठीच सरकारी विमान वापरण्याची मुभा असेल.पाकिस्तानमध्ये कार्यालयांच्या कामाची वेळ सकाळी आठ ते दुपारी चार अशी होती आता ती सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच अशी करण्यात आली आहेत.  इम्रान यांच्या कॅबिनेटने सर्व कार्यालयांमध्ये केवळ एकच म्हणजे फक्त रविवारी सुटी असेल असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शनिवारची सुटी रद्द झाली आहे.त्याचप्रमाणे कॅपिटल अॅडमिनिस्ट्रेशन अँड डेव्हलपमेंट डिविजन हे मंत्रालय रद्द करुन त्याच्या कामाची विभागणी इतर मंत्रालयांमध्ये करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या राखीव अधिकारांचा उपयोग करत 51 अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च केले होते. सरकारी अधिकारी आणि नेते करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग करतात, उधळपट्टी करतात अशी भावना पाकिस्तानी लोकांच्या मनामध्ये अनेक वर्षांपासून आहे. पाकिस्तानातील माध्यमंही या उधळपट्टीवर आणि नेत्यांच्या श्रीमंती राहणीवर नेहमीच भाष्य करत असतात. त्यामुळे इम्रान यांनी सत्तेत आल्यापासूनच ही प्रतिमा बदलण्यासाठी नवे निर्णय घेत खर्च कमी करण्याचे निश्चित केले आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधान