नवाज शरीफ यांना विरोध, पाकमधील विशेष अधिवेशनावर इमरान खानचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2016 12:40 IST2016-10-05T12:36:29+5:302016-10-05T12:40:46+5:30
पाकिस्तानने संसदेचे विशेष अधिवेधन बोलावले आहे. मात्र या अधिवेशनावर पाकिस्तानमधील तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचा प्रमुख इमरान खानने बहिष्कार टाकला आहे.

नवाज शरीफ यांना विरोध, पाकमधील विशेष अधिवेशनावर इमरान खानचा बहिष्कार
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 5 - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून पाकिस्तानने धसका घेतला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी पाकिस्तानने संसदेचे विशेष अधिवेधन बोलावले आहे. मात्र या अधिवेशनावर पाकिस्तानमधील तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचा प्रमुख इमरान खानने बहिष्कार टाकला आहे. यावरुन भारताविरोधी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तानला धक्का बसल्याचे दिसत आहे.
अधिवेशनात सहभागी झाल्यास पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नेतृत्व स्वीकारल्यासारखे होईल, अशी प्रतिक्रिया इमरानने अधिवेशनावर बहिष्कार टाकल्याचे घोषित केल्यानंतर दिली. नवाज शरीफ यांच्यावर पनामा वृत्तपत्रातून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने इमरानने त्यांना विरोध केला आहे. नवाज शरीफ यांच्या बाबतच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असे सांगत भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे शरीफ यांनी त्यांचे नैतिक अधिकार गमावल्याचे देखील त्याने म्हटले आहे.
आणखी बातम्या :
पेशावरमधील सैनिकी शाळेवरील हल्ल्यानंतर सुरू केलेल्या दहशतवादविरोधातील मोहीम यशस्वीपणे राबवण्यात पंतप्रधान शरीफ अपयशी ठरले आहेत. तसंच 'उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात इतका आरडाओरडा सुरू असताना, नेतृत्व करण्याऐवजी ते कुठे होते?, लंडनमध्ये शॉपिंग करत होते', असा टोला देखील इमरानने हाणला आहे.