शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Imran Khan on Russia Tour: युक्रेनवर हल्ला! रशियात पोहोचताच इम्रान खान यांचे रागरंगच बदलले; हा Video पहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 13:49 IST

Imran Khan on Russia Tour viral video: अमेरिकेने आणि रशियानेही युक्रेनवरून निर्माण होणाऱ्या संकटावर पाकिस्तानला कल्पना दिली आहे. तरी देखील इम्रान खान तिथे गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मॉस्को : पाकिस्तानचे पंतप्रधान गेल्या दोन दशकांत पहिल्यांदाच रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. इम्रान खानरशियात पोहोचायला आणि रशियाने युक्रेनसोबत युद्धाची घोषणा करायला एकच वेळ झाली आहे. यामुळे विमानतळावर पोहोचताच खान यांनी रशियाने युक्रेनवर हल्ला सुरु केलाय, मी खूप योग्य वेळी आलो आहे. खूप उत्सूक आहे, अशा आशयाचे वक्तव्य केले आहे. या स्वागताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. 

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु झाले आहे. अमेरिका आणि मित्रराष्ट्रे रशियावर आक्रमण करण्याच्या पवित्र्यात असताना पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान रशियात जाऊन पोहोचले आहेत. रशियन मंत्र्यांनी त्यांचे विमानतळावर जंगी स्वागत केले. अमेरिकेने खान यांच्या या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच जबाबदार देश म्हणून रशियाच्या या पावलावर त्यांनी चिंता व्यक्त करावी असे म्हटले आहे. परंतू इम्रान यांचे हे वक्तव्य त्याच्या उलट आहे. 

अमेरिकेने आणि रशियानेही युक्रेनवरून निर्माण होणाऱ्या संकटावर पाकिस्तानला कल्पना दिली आहे. तरी देखील इम्रान खान तिथे गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मॉस्कोमध्ये इम्रान खान आणि पुतिन यांच्या भेटीबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, रशियाने युक्रेनवर नुकत्याच केलेल्या हल्ल्याबाबत आम्ही पाकिस्तानला आमची भूमिका कळवली आहे. युद्धावर मुत्सद्देगिरी पुढे नेण्याच्या आमच्या प्रयत्नांचीही आम्ही त्यांना माहिती दिली आहे.

इम्रान खान काय म्हणालेइम्रान खान यांचा मॉस्कोच्या विमानतळावर उतरल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मी किती योग्य वेळी आलो आहे, याची मला खूप उत्सुकता आहे. मी खूपच उत्सुक आहे, असे इम्रान खान म्हणत आहेत. यावेळी इम्रान खान यांच्यासोबत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशीही आहेत. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाPakistanपाकिस्तान