शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

Imran Khan News: इम्रान खान लंडनला निघून जाणार? पाकिस्तानी नेते London मध्येच आश्रय का घेतात? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 15:26 IST

Imran Khan Latest News: इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाकिस्तान आर्मीने त्यांच्याविरोधात आर्मी अॅक्ट लावला आहे.

Imran Khan Latest News: इतिहास साक्षी आहे की, ज्याने पाकिस्तानात लष्कराशी पंगा घेतला, त्याला एकतर तुरुंगवास भोगावा लागला किंवा देशातून पळून जावे लागले. आता माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर आर्मी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना एकतर लंडनला निघून जाण्यास किंवा खटल्याला सामोरे जाण्यास सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे. इम्रान हे पहिले नेते नाहीत, ज्यांना लंडनला पळून जावे लागणार आहे. पाकिस्तानी नेत्यांचे 'लंडनप्रेम' खूप जुने आहे.

लंडनमधील काही भाग पाहिल्यावर तुम्हाला 'मिनी पाकिस्तान' असल्याचा भास वाटेल. अनेक पाकिस्तानी नेत्यांनी आणि लष्कराच्या विरोधकांनी इथे आश्रय घेतला आहे. बेनझीर भुट्टो असो की, परवेज मुशर्रफ किंवा नवाझ शरीफ, प्रत्येकाने लंडनला आपले दुसरे 'घर' बनवले आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की, लंडनच का? 

बेनझीर भुट्टोंनी फ्लॅट भाड्याने घेतला होतापाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांची मुलगी आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी लंडनला एक प्रकारे त्यांचे अनधिकृत कार्यालय बनवले होते. 1979 मध्ये त्यांच्या वडिलांना फाशी दिल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या आईला अटक करण्यात आली. सुमारे एक वर्षानंतर सुटका झाली, पण 1981 मध्ये बेनझीर यांना पुन्हा अटक करण्यात आली. तुरुंगवासानंतर त्या जवळपास दोन वर्षे नजरकैदेत राहिल्या. अमेरिकेचा दबाव वाढल्यावर 1984 मध्ये लष्कराने बेनझीर यांना जिनिव्हाला जाणाऱ्या विमानात बसवले.

जिनिव्हाहून बेनझीर थेट लंडनला गेल्या, तिथे त्यांनी भाड्याने फ्लॅट घेतला. यासोबतच त्यांच्या आजारावर उपचारही करून घेतले. हळुहळू बेनझीर यांनी या फ्लॅटला आपले पक्ष कार्यालय बनवले. 1985 मध्ये त्या पाकिस्तानात परतल्या, पण 90 च्या दशकात त्यांना पुन्हा लंडनमध्ये आश्रय घ्यावा लागला. 2007 मध्ये त्यांच्या मृत्यूच्या एक वर्ष आधीही त्या लंडनमध्ये होत्या.

नवाझ शरीफ आणि बेनझीर शेजारी बनलेपाकिस्तानात एकमेकांविरुद्ध बोलणारे बेनझीर भुट्टो आणि नवाझ शरीफ लंडनमध्ये चांगले शेजारी बनले. 1999 मध्ये मुशर्रफ यांनी सत्ता काबीज केली तेव्हा नवाझ शरीफ यांनीही लंडनमध्ये आश्रय घेतला. 10 वर्षांच्या तुरुंगवासाच्या ऐवजी त्यांनी लंडनला जाण्याच्या लष्कराच्या प्रस्तावाला होकार दिला. 2000 मध्ये ते लंडनला गेले. 2007 मध्ये परतले, पण 2019 मध्ये इम्रान सरकार आल्यावर त्यांना पुन्हा परतावे लागले. तरीही त्यांनी लंडनमधूनच पक्ष चालवला आणि भाऊ-मुलीच्या माध्यमातून पुन्हा सत्तेत आले.

परवेझ मुशर्रफज्या परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांना लंडनला पाठवले, त्याच माजी लष्करप्रमुखांना नंतर त्यांचे शेजारी व्हावे लागले. 2008 नंतर परिस्थिती बदलली आणि नवाझ शरीफ पंतप्रधान झाले आणि मुशर्रफ यांना लंडनला जावे लागले. मात्र, अखेरच्या दिवसात ते दुबईला गेले, तिथे विस्मृतीत जगत त्यांनी जगाचा निरोप घेतला. याशिवाय अनेक पाकिस्तानी नेत्यांनी लंडनमध्ये आश्रय घेतला आहे.

लंडनच का?आता प्रश्न पडतो की, फक्त लंडनच का? यूकेचे कायदे असे आहेत की, ते निर्वासितांना संरक्षण देतात. ब्रिटनच्या प्रत्यार्पण कायद्यामुळे येथे येणाऱ्या लोकांना वाचवण्याची संधी मिळते. यातील कलम 9 मध्ये अशा चार तरतुदी आहेत, ज्या आश्रय मागणाऱ्याला येथे राहण्याचे स्वातंत्र्य देतात. याशिवाय येथे मानवी हक्क कायदाही अतिशय कडक आहे. हा कायदा प्रत्येक नागरिकाच्या 15 मूलभूत अधिकारांचे संरक्षण करतो. यामुळे पाकिस्तानातील नेते असो किंवा भारतातून फरार झालेले लोक, लंडनमध्येच आश्रय घेतात.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानLondonलंडन