इस्लामाबाद : प्रसिद्ध क्रिकेटपटू इम्रान खान (६२) यांनी गुरुवारी टीव्ही अँकर रेहाम खान (४२) हिच्याशी विवाह केला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खान यांच्या विवाहाच्या चर्चेला यामुळे पूर्णविराम मिळाला. येथून जवळ असलेल्या बानी गाला फार्म हाऊसवर मुफ्ती सईद यांनी विवाहविधी पार पाडला. तहरिक ए इन्साफ या राजकीय पक्षाचे इम्रान खान हे प्रमुख आहेत. तहरिक ए इन्साफच्या प्रवक्त्या शिरीन मझारी यांनी ही बातमी टिष्ट्वटरवर दिली. इम्रान खान यांचे विवाहाबद्दल अभिनंदन. हा कार्यक्रम साधा राहावा आणि इम्रान खान यांच्या निर्णयाचा आपण सन्मान ठेवला पाहिजे, असे शिरीन मझाली म्हणाल्या. खान व रेहाम यांचा यापूर्वीच निकाह झाला होता का याबद्दल मझारी यांनी काही बोलण्यास नकार दिला. शुक्रवारी गरीब मुलांमध्ये अन्नदान केले जाईल, असे त्या म्हणाल्या. या विवाहप्रसंगी इम्रान खान यांच्या चारही बहिणी उपस्थित नव्हत्या. (वृत्तसंस्था)
इम्रान खान विवाहबद्ध
By admin | Updated: January 9, 2015 02:12 IST