शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Imran Khan:"पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकला असता तर बरं झालं असतं", इम्रान खान असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 09:04 IST

Imran Khan: ''माझ्या हत्येच्या कट रचला जातोय, याचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे. मला काही झालं तर तो व्हिडिओ सार्वजनिक केला जाईल."

कराची: पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या हातून सत्ता गेल्यापासून ते पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चे अध्यक्ष आणि देशाचे नवीन वझीर-ए-आझम शाहबाज शरीफ यांच्या सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. आता परत एकदा इम्रान खान यांनी सरकारवर केलेल्या टीकेची जोरदार चर्चा सुरू आहे. "अशा चोरांच्या हाती सत्ता देण्यापेक्षा कुणीतरी देशावर अणुबॉम्ब (Nuclear Bomb) टाकला असता तर बरं झालं असतं," असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं आहे.

सत्ता गेल्याचे दुःख कायम पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे हे अजब विधान सध्या व्हायरल होत आहे. द न्यूज इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार, इम्रान खान म्हणाले की, "चोरांच्या हाती सत्ता सोपवण्यापेक्षा देशावर कुणी अणुबॉम्ब टाकला असता तर बरं झालं असतं. देशावर चोरांचे सरकार लादल्याने मला धक्का बसला आहे. सत्तेवर आलेल्या चोरांनी प्रत्येक संस्था आणि न्यायव्यवस्था उद्ध्वस्त केली, आता या गुन्हेगारांच्या प्रकरणांची चौकशी कोणता सरकारी अधिकारी करणार?" असा सवाल त्यांनी यावेळी केला.

पाकिस्तानी पंतप्रधानांचे उत्तरइम्रान खानच्या या वक्तव्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "इम्रान खान आपल्या भाषणांनी सरकारी संस्थांना लक्ष्य करून पाकिस्तानी जनतेच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत." दरम्यान, इस्लामाबादमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संसदेच्या पहिल्या अधिवेशनात शाहबाज शरीफ म्हणाले होते की, "ते (इमरान खान) नवीन सरकार आणि जनतेला वारंवार चोर आणि डाकू म्हणत असल्यामुळे देश दोन गटात विभाजित झाला आहे."

माझ्या जीवाला धोका- इम्रान खानकाल दुपारी सियालकोटमध्ये झालेल्या रॅलीत इम्रान खान यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा पुनरुच्चार केला आहे. ते म्हणाले, ''माझ्या हत्येच्या कटाचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे, ज्यामध्ये त्या सर्व लोकांची नावे आहेत जे त्यांचे सरकार हटवण्याच्या कटात सामील होत. मला काही झाले तर त्यांनी सुरक्षित ठिकाणी ठेवलेला व्हिडिओ सार्वजनिक केला जाईल."

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान