शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यास इम्रान खान यांना सशर्त परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 11:52 IST

सरकारी हेलिकॉप्टरचा वापर केल्याच्या आराेपावरून चाैकशी प्रलंबित

पेशावर : पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पाकिस्तान तहरीक ए इंसाफ (पीटीआई) पक्षाचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना निवडणूक आयोगाने संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यास सशर्त परवानगी दिली आहे.    इम्रान खान यांनी पाच मतदारसंघांमधून निवडणूक लढविली होती. यापैकी इस्लामाबाद-2 आणि लाहोर-9 या दोन जागांवरील निकाल आयोगाने राखून ठेवले आहेत. इम्रान खान यांनी येत्या 11 ऑगस्टला पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचे जाहीर केले होते. आयोगाच्या निर्णयामुळे हा शपथविधी पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.    भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणामध्ये मंगळवारी इम्रान खान हे एसीबी समोर हजर झाले होते. त्यांच्यावर खैबर पख्तुन्वा प्रांताच्या निधीतून 21.7 लाखांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. नॅशनल अकाऊंटबिलिटी ब्युरोने (नॅब) त्यांना दोनदा समन्स पाठिवले होते. मात्र, इम्रान खान गैरहजर राहिले होते. त्यांच्या वकिलाने 7 ऑगस्टची वेळ मागून घेतली होती.   इम्रान खान यांनी 2013 मध्ये खैबर पख्तूनवा प्रांतामध्ये सरकार स्थापन केले होते. या दरम्यान त्यांनी खासगी वापरासाठी 72 तास सरकारी हेलिकॉप्टरचा वापर केला होता. या प्रकरणातच नॅबने त्यांच्याकडे खुलासा मागिवला होता.  नॅबचा आरोप आहे की, खासगी वापरासाठी ते सरकारी हेलिकॉप्टर वापरू शकत नव्हते. यामुळे सरकारी खजिन्याचे नुकसान झाले आहे.

 सध्या या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना पाचपैकी तीन मतदारसंघात सशर्त विजयी घोषित करत सदस्यत्वाची शपथ घेण्यास परवानगी दिली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानprime ministerपंतप्रधान