शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बुशरा बिबीला अन्नातून टॉयलेट क्लीनर?; माझ्या पत्नीला काही झालं, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 07:54 IST

आपल्याला विषप्रयोग करून मारण्याचा लष्कराचा आणि सरकारचा डाव आहे, असा आरोप खुद्द बुशरा बिबीही गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत

इमरान खान हे पाकिस्तानातील एकमेव असं व्यक्तिमत्त्व आहे, जे कायम चर्चेत असतं. इमरान खान जेव्हा क्रिकेट खेळत होते, तेव्हापासून त्यांची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतेच आहे. त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही लोकांच्या मनातली त्यांची प्रतिमा कायम राहिली. ‘चाॅकलेट हिरो’ म्हणून आजही लोक त्यांच्याकडे बघतात. त्यांच्या याच प्रतिमेचा त्यांना फायदा झाला. क्रिकेटमधली कारकीर्द त्यांनी गाजवली, तशीच राजकारणातली त्यांची कारकीर्दही अनेक कारणांनी गाजली. त्यांची ‘धडाकेबाज’ प्रवृत्ती लोकांनी कायमच उचलून धरली. त्यामुळेच राजकारणातील अल्प कालावधीतही ते थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या खुुर्चीवर जाऊन बसले. 

अर्थात वाद आणि इमरान यांचं जणू समीकरणच आहे. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत, त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात, राजकारणात आणि अगदी पंतप्रधान झाल्यानंतरही आरोप आणि वाद-विवादांनी त्यांची पाठ कधी सोडली नाही. त्यांच्यावर आणि त्यांची पत्नी बुशरा बिबी यांच्यावर सत्तेचा दुरुपयोग केल्याचे आणि भ्रष्ट मार्गानं संपत्ती कमवल्याचे अनेक आरोपही झाले. याच आरोपाखाली दोघेही पती-पत्नी सध्या अटकेत आहेत. इमरान खान रावळपिंडी येथील तुरुंगात आहेत, तर बुशरा बिबी यांना त्यांच्या स्वत:च्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. अर्थात तुरुंगातही इमरान खान स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांनी लष्कराला धारेवर धरणं सोडलं नाही. आपल्या आणि पत्नीच्या हत्येचे सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत, हे आरोपही ते नित्यनेमानं करीत आहेत. आपल्या पत्नीला विष पाजून मारले जाण्याचे प्रयत्न होताहेत हा आरोप तर ते सातत्यानं करीत आहेत. 

दोन हजार कोटी रुपयांच्या घाेटाळ्याच्या संबंधित एका खटल्याची सुनावणीही सध्या सुरू आहे. या सुनावणीप्रसंगी न्यायाधीशांच्या समक्षच इमरान खान यांनी पुन्हा एकदा आरोप केला की लष्कर त्यांच्या पत्नीवर विषप्रयोगाचा सातत्यानं प्रयत्न करीत आहे. यावेळी तर बुशराला तिच्या जेवणात टॉयलेट क्लीनर मिसळून मारण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळेच बुशराचं सातत्यानं पोट दुखतं, पोटात, घशात, छातीत जळजळ होते.. विषप्रयोगाच्या या प्रयत्नांतूनच बुशराला या जगातून उठविण्याचा प्रयत्न होतो आहे, असा दावा त्यांनी केला. माझ्या पत्नीला काही झालं, तर लष्कराला आणि लष्करप्रमुख आसीम मुनीर यांना मी सोडणार नाही, असा दम द्यायलाही ते विसरले नाहीत. 

आपल्याला विषप्रयोग करून मारण्याचा लष्कराचा आणि सरकारचा डाव आहे, असा आरोप खुद्द बुशरा बिबीही गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत. आपल्या जिवाला धोका असल्यानं आपल्याला आपल्याच घरात नजरकैदेत न ठेवता सर्वसामान्यांप्रमाणे तुरुंगात ठेवावं अशी मागणीही बुशरा बिबी यांनी केली होती; पण त्यांची ही मागणी अमान्य करण्यात आली. 

इमरान यांचं म्हणणं आहे, शौकत खान रुग्णालयाचे अधिकारी डॉ. असीम युसुफ यांनी बुशरा बिबी यांची आरोग्य तपासणी शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये करावी असा सल्ला दिला होता, पण जेल प्रशासन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्येच तपासण्या करण्यासाठी हटून बसलं आहे. इमरान यांच्या आरोपानंतर न्यायालयानं दोघाही नवरा-बायकोची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश तुरुंग प्रशासनाला दिले आहेत, मात्र त्याचवेळी माध्यमं, पत्रकारांशी बोलण्यालाही इमरान यांना मनाई केली आहे. पण इमरान यांचं म्हणणं आहे, माझ्या संदर्भात जाणूनबुजून चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या अफवांचं खंडन करण्यासाठीच मी मीडियाशी बोलतो! 

तुरुंग प्रशासन अन्नात विष मिसळून मला मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचं सिद्ध करण्यासाठीच मला खासगी हॉस्पिटलमधून चेकअप करवून घ्यायचं आहे, मात्र आपलं पितळ उघडं पडेल या भीतीनंच तुरुंग अधिकारी या गोष्टीला मान्यता देत नसल्याचं बुशरा बिबीचं म्हणणं आहे. माझ्या अन्नात रोज थोडे थोडे टॉयलेट क्लीनर मिसळून मला ठार मारण्याचा लष्कराचा नवा डाव मी कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा दावाही बुशरा बिबी यांनी केला आहे.

इमरान-बुशरा यांना ३१ व २१ वर्षे शिक्षाइमरान खान गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात आहेत. तोशाखानाप्रकरणी त्यांना तीन वर्षांची, तर त्यानंतर झालेला हिंसाचार, बेकायदेशीर निकाह आणि तोशाखाना प्रकरणाशी संबंधित आणखी एका घोटाळ्याप्रकरणी त्यांना एकूण ३१ वर्षांची शिक्षा झाली आहे. बुशरा बिबी यांनाही तोशाखाना आणि बेकायदा निकाहप्रकरणी २१ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बनिगाला बंगल्यात त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWorld Trendingजगातील घडामोडी