शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Imran Khan Arrest : इम्रान खान समर्थकांचा ISI मुख्यालयावर हल्ला, लष्करानं जनतेवर गोळीबार केल्याचाही दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 20:44 IST

आदोलकांनी रेडियो पाकिस्तानच्या पेशावरमधील इमरातीलाही आग लावली. संपूर्ण देशात कलम १४४ लागू.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना आज(मंगळवारी) अटक करण्यात आली. पाकिस्तानी निमलष्करी दलानं इस्लामाबाद उच्च न्यायालयातून त्यांना अटक आली. पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयातून इम्रान खान यांच्या अटकेचे व्हिडीओ समोर आले होते. यात पाक रेंजर्सनं माजी पंतप्रधानांना ढकलून कारमध्ये बसवलं. त्यांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानात तणावाचं वातावरण आहे. तसंच पाकिस्तानात कलम १४४ लागू करण्यात आलंय.

एका दिवसापूर्वीच इम्रान खान यांनी देशाच्या लष्करावर त्यांच्या कथितरित्या हत्येचा कट रचण्याचा आरोप केला होता. आयएसआयच्या एका अधिकाऱ्यानं या आरोपांचं खंडन केलं होता. दरम्यान, इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात त्यांच्या समर्थकांद्वारे मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तसंच आंदोलक पाकिस्तानी लष्कराचे कोअर कमांडर यांच्या घरातही शिरले. तर दुसरीकडे लाहोरशिवाय इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपरिंडीतील लष्कराच्या मुख्यालयावरही हल्ला केला. त्यांना सोडण्यात येत नाही तोवर आपण या ठिकाणाहून जाणार नसल्याचा पवित्राही त्यांनी घेतल्याचं म्हटलं जातंय.

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात कलम १४४ लागू करण्यात आलंय. याशिवाय लष्कराकडून गोळीबार करण्यात आला असून यात एका मुलाचा मृत्यू झाला असून चार अन्य लोकांनाही गोळ्या लागल्याचा दावा पीटीआयकडून करण्यात आलाय. तर दुसरीकडे आंदोलकांनी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मुख्यालयावरही हल्ला केला. बलुचिस्तानातही आंदोलनादरम्यान पाकिस्तानी लष्करानं जनतेवर गोळीबार केल्याचं म्हटलं जातंय. आदोलकांनी रेडियो पाकिस्तानच्या पेशावरमधील इमरातीलाही आग लावली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान