शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

चोर, डाकू, घोटाळेबाज, दरोडेखोर...इम्रान खान यांची शहबाज शरीफ यांच्यावर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 18:27 IST

Imran Khan Arrest News: पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप आला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.

Imran Khan Arrest News :  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांना तोशाखाना प्रकरणी कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. इस्लामाबाद पोलीस त्यांच्या अटकेचे वॉरंट घेऊन इम्रान यांच्या जमान पार्क येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. इम्रान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले चौधरी फवाद यांच्यासह अनेक नेते त्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत. यादरम्यान इम्रान खान यांनी घराबाहेर येऊन आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी शहबाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका केली.

मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तोशाखाना प्रकरणात अटकेची टांगती तलवार आहे. त्यांना आता कधीही अटक होऊ शकते, त्यामुळे आता त्यांनी पाकिस्तान सरकारविरोधात युद्ध पुकारले आहे. 

आपल्या भाषणात इम्रान म्हणाले, 'ना मी कुणासमोर झुकलो ना तुम्हाला झुकू देणार. या चोर-डाकुंनी पाकिस्तानला कुठे नेऊन ठेवलंय. जो समाज गुलाम आहे तो कधीही स्पर्धा करू शकत नाही. केवळ स्वतंत्र समुदायच स्पर्धा करू शकतो. पाकिस्तान आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या महागाईत बुडाला आहे. जगासमोर आपल्या देशाचा अपमान होत आहे. भारतातील वाहिन्या बघा, तेही आपला अपमान करत आहेत, असं इम्रान म्हणाले.

blockquote class="twitter-tweet">

What future can a country have when crooks are thrust as rulers upon it? SS was about to be convicted by NAB for Rs 8 bn money laundering & by FIA for another Rs 16 bn corruption when he was rescued by Gen Bajwa who kept getting NAB cases trial postponed. While under trial he was

— Imran Khan (@ImranKhanPTI) March 5, 2023

लाहोरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना इम्रान खान यांनी शहबाज शरीफ यांना घोटाळेबाज, चोर, डाकू, दरोडेखोर म्हटले. त्याआधी त्यांनी ट्विट केले होते की, या देशाचे (पाकिस्तान) भविष्य काय असू शकते. शहबाज शरीफ यांना NAB कडून 8 अब्ज मनी लाँड्रिंग आणि FIA कडून 16 अब्ज रुपयांच्या भ्रष्टाचारात दोषी ठरवले जाणार होते, तेव्हा जनरल बाजवा यांनी त्यांना वाचवले.

इम्रान खान पुढे म्हणाले की, शहबाज शरीफ पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच त्यांच्याविरुद्धच्या खटल्यांचा तपास करणार्‍या संस्थांचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रथम एफआयए आणि आता एनएबी, जेणेकरुन ते स्वतंत्रपणे 16 अब्जांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करू शकतील आणि 8 मनी लाँडरिंगमधून स्वत: ला मुक्त करू शकतील, अशी टीका इम्रान खान यांनी केली. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय