इम्रानचा पुन्हा निकाह

By Admin | Updated: January 2, 2015 02:23 IST2015-01-02T02:23:17+5:302015-01-02T02:23:17+5:30

बीबीसीची अँकर रिहाम खान ही इम्रानची नववधू आहे. ६२ वर्षांच्या इम्रानने गेल्या आठवड्यात रिहाम (४१) शी गुपचूप विवाह केला आहे.

Imran again married | इम्रानचा पुन्हा निकाह

इम्रानचा पुन्हा निकाह

कराची : पाकिस्तानचा क्रिकेटपटू व राजकीय नेता इम्रान खान याने पुन्हा निकाह केला असून, बीबीसीची अँकर रिहाम खान ही इम्रानची नववधू आहे. ६२ वर्षांच्या इम्रानने गेल्या आठवड्यात रिहाम (४१) शी गुपचूप विवाह केला आहे.
रिहाम घटस्फोटिता असून, आधीच्या विवाहातून तिला तीन मुले आहेत. तिच्या पहिल्या विवाहानंतर ती ब्रिटनमध्ये राहत असे, बीबीसीवर हवामानाचा प्रांतिक अंदाज देण्याचा साऊथ टुडे हा कार्यक्रम ती सादर करीत असे.
इम्रान खान याचाही पहिला विवाह झाला आहे. जेमिमा गोल्डस्मिथ या श्रीमंत तरुणीशी त्याचा विवाह झाला होता. या विवाहातून त्याला दोन मुले आहेत.
आपला माजी पती इम्रान पुन्हा विवाह करीत असल्याने आपण त्याचे खान हे आडनाव यापुढे लावणार नाही, असे जेमिमाने आॅक्टोबर महिन्यात जाहीर केले होते. पाकिस्तानातील राजकीय विश्लेषक व इम्रान खान याचा जवळचा मित्र डॉ. शहीद मसूद यांनी दिलेल्या माहितीनुसार इम्रानने हा विवाह झाल्याचे मान्य केले नाही, तसेच त्याचा इन्कारही केला नाही. नवदाम्पत्याने अधिकृतरीत्या विवाहाची घोषणा केलेली नाही.
(वृत्तसंस्था)

Web Title: Imran again married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.