यूएस व्हिसाच्या अर्जासाठी ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं का गरजेचं असतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 07:26 AM2019-03-16T07:26:09+5:302019-03-16T07:28:02+5:30

अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना http://www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं गरजेचं आहे.

importance of creating and updating online profile to apply for a US visa | यूएस व्हिसाच्या अर्जासाठी ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं का गरजेचं असतं?

यूएस व्हिसाच्या अर्जासाठी ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं का गरजेचं असतं?

googlenewsNext

प्रश्न: अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं आणि ते अपडेट करणं गरजेचं का असतं?
उत्तर: अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना http://www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं गरजेचं आहे. तुम्ही नॉनइमिग्रंट किंवा इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करत असल्यास या प्रोफाईलमुळे व्हिसा प्रक्रियेसाठी लागणारी अचूक माहिती मिळते. दूतावासाकडून पासपोर्ट मिळवताना, संवाद साधला जात असताना ऑनलाइन प्रोफाईलची मदत होते. 

ऑनलाइन प्रोफाईलमध्ये तुम्हाला संपर्काचा तपशील, पासपोर्टची माहिती, मुलाखतीची तारीख आणि वेळ, कागदपत्रं गोळा करण्यासंदर्भातील आणि इतर माहिती द्यावी लागते. ऑनलाइन प्रोफाईलमुळे व्हिसा ऍप्लिकेशन सेंटर (व्हीएसी,) दूतावास यांच्यात आवश्यक ताळमेळ राखला जातो. यामुळे तुमच्या अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ होते. 

तुम्ही पहिल्यांदा अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करत असाल, तर न्यू युजर हा पर्याय निवडा. आधी व्हिसासाठी अर्ज केलेला असल्यास आधीच तयार करण्यात आलेल्या प्रोफाईलवर लॉग इन करा. तुम्हाला प्रत्येकवेळी तुमची सर्व माहिती भरण्याची गरज नाही. मात्र तुम्ही कशासाठी अमेरिकेला जात आहात, याबद्दलची माहिती भरुन प्रोफाईल अपडेट करणं गरजेचं आहे. याशिवाय तुमचा सध्याचा संपर्क तपशील देणंदेखील आवश्यक आहे.  

ऑनलाइन प्रोफाईल अतिशय युजर फ्रेंडली आहे. यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिसा प्रक्रिया पूर्ण करू शकता. बहुतांश अर्जदारांना तिसऱ्या व्यक्तीची मदत लागत नाही. तुम्ही स्वत: संपूर्ण प्रक्रिया पार पाडत असाल, तर चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यतादेखील कमी होते. याशिवाय पैशांचीदेखील बचत होते. मात्र तरीही थर्ड पार्टी एजंटची मदत घेण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. अशा परिस्थितीत तुमची आणि तुमच्या वतीनं अर्ज करणाऱ्या व्यक्तीची योग्य माहिती अर्जात भरली गेली आहे ना, याची खात्री करा. कारण तुम्ही मुलाखतीवेळी दिलेल्या उत्तरांची आणि अर्जातील माहितीची पडताळणी केली जाते. 

तुम्ही अतिशय सहजपणे तुमचं प्रोफाईल तयार करुन ते अपडेट करू शकता. यामुळे तुमच्या अमेरिकेतील ट्रिपची तणावरहीत आणि संस्मरणीय सुरुवात होईल. 
 

Web Title: importance of creating and updating online profile to apply for a US visa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.