शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"या ४ देशांशी संबंध ठेवाल तर...!"; व्हेनेझुएलाला अमेरिकेचं आणखी एक 'फरमान', एक तर भारताचा 'जिगरी' मित्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:16 IST

us tells venezuela to cut ties with these 4 countries including 1 friend of india

निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. यातच आता अमेरिकेने व्हेनेझुएलासाठी नवे फर्मान काढले आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाला चार देशांसोबतचे संबंध कमी करण्यास किंबहुना तोडण्यासच सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे, यात भारताचा 'जिगरी मित्र' असलेल्या रशियाचाही समावेश आहे.

व्हेनेझुएलाने तेल उत्पादनात केवळ अमेरिकेसोबत विशेष भागीदारी करावी आणि कच्च्या तेलाच्या विक्रीसंदर्भात अमेरिकेला प्राधान्य द्यावे. एवढेच नाही तर, एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, व्हेनेझुएलाने चीन, रशिया, इराण आणि क्युबा यांच्याशी असलेले आर्थिक संबंध पूर्णपणे तोडून त्यांना बाहेर काढावे, असेही अमेरिकेने म्हटले आहे. 

...तरच व्हेनेझुएलाला अधिक तेल उत्पादनाची परवानगी मिळेल -याशिवाय, या अटी मान्य केल्यावरच व्हेनेझुएलाला अधिक तेल उत्पादनाची परवानगी मिळेल, असे संबधित वृत्तात तीन अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने म्हणण्यात आले आहे. निकोलस मादुरो यांना अमेरिकन विशेष दलाने अटक करून न्यूयॉर्कला नेल्यानंतर आणि डेल्सी रोड्रिगेज यांना अंतरिम राष्ट्राध्यक्ष घोषित केल्यानंतर या घडामोडी घडल्या आहेत.

महत्वाचे म्हणजे, ह्यूगो शावेज आणि मादुरो यांच्या कार्यकाळापासूनच व्हेनेझुएला आर्थिकदृष्ट्या आणि सुरक्षा सहकार्यासाठी चीन, रशिया, इराण आणि क्युबावर अवलंबून राहिला आहे. यामुळे हे संबंध तोडणे हा व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र धोरणातील मोठा निर्णय असेल. 

व्हेनेझुएला अमेरिकेला ३० ते ५० दशलक्ष बॅरल तेल देईल -दरम्यान, ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, व्हेनेझुएला अमेरिकेला ३० ते ५० दशलक्ष बॅरल तेल देईल, ज्यातून मिळणारे उत्पन्न दोन्ही देशांच्या फायद्यासाठी वापरले जाईल. तसेच, अमेरिकन तेल कंपन्यांच्या व्हेनेझुएलातील गुंतवणुकीसंदर्भातही लवकरच चर्चा होईल. तसेच, देशाच्या भविष्यासंदर्भात विशेषत्वाने तेल महसुलाच्या नियोजनात अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US ultimatum to Venezuela: Cut ties with Russia, China, Iran, Cuba!

Web Summary : US demands Venezuela sever ties with Russia, China, Iran, Cuba for oil access. Venezuela must prioritize US oil partnerships. Trump says Venezuela will provide oil to the US, benefiting both countries.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिकाrussiaरशियाchinaचीन