शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लंडनला जाणार असाल तर लक्ष द्या! AIR INDIA ने केला महत्त्वाचा बदल, ट्विटरवरून केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:47 IST

१० डिसेंबरपासून एअर इंडियाने ट्रॅव्हल अडव्हायसरी म्हणजे प्रवासासंबंधीची नियमावली जारी केली आहे

Air india travel Advisory, London Heathrow airport: तुम्ही जर नजीकच्या काळात लंडनला जाणार असाल तर तुमच्यासाठी एक कामाची बातमी आहे. एअर इंडियाने आज म्हणजेच १० डिसेंबर रोजी एक ट्रॅव्हल अडव्हायसरी म्हणजे प्रवासासंबंधीची नियमावली जारी केली आहे. यात प्रवाशांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. एअरलाइनच्या या घोषणेमुळे तुमचा प्रवास अधिक सोपा होणार आहे. एअर इंडियानेलंडन हिथ्रो विमानतळावरून भारतात जाण्यासाठी चेक-इनची वेळ वाढवली आहे. आता प्रवाशांना अधिकची सुविधा मिळणार आहे. प्रवाशांसाठी या विमानतळावरून चेक इनची वेळ ६० मिनिटांवरून ७५ मिनिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

एअर इंडिया काय म्हणाली?

एअर इंडियाने सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करून ही माहिती दिली. पोस्टमध्ये, एअर इंडियाने म्हटले आहे की, लंडन हिथ्रो विमानतळावरून भारताकडे प्रस्थान करण्यासाठी, चेक-इन काउंटर आता तुमच्या निर्धारित वेळेच्या ७५ मिनिटे आधी सुरु होतील. ही वेळ आधी ६० मिनिटे होती. पण प्रवाशांच्या सोयीसाठी ही वेळ वाढवण्यात आली आहे.

बदल का करण्यात आला?

एअर इंडियाने सांगितले की, प्रवाशांना प्रवासात आराम वाटावा यासाठी त्यांनी चेक इनची वेळ ६० मिनिटांवरून १५ मिनिटांनी वाढवून ७५ मिनिटे करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यस्त वेळापत्रकातही आरामात विमान प्रवास व्हावा म्हणून हा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे असे केले गेले आहे जेणेकरून गर्दीच्या वेळेतही चेक-इन प्रक्रिया आणि सुरक्षा मंजुरीसाठी पुरेसा वेळ मिळेल.

यापूर्वी एअर इंडियाने भारताच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी चेक-इनची वेळ ६० मिनिटांवरून ७५ मिनिटांपर्यंत वाढवली होती.

 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAirportविमानतळLondonलंडनIndiaभारत