सध्या अमेरिका-भारत संबंध टॅरिफ मुद्द्यावरून प्रचंड ताणले गेले आहेत. यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीय वस्तूंवरील टॅरिफ आणखी वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भारतावर ५० टक्के एवढे टॅरिफ लादण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करत असल्याने आपण भारतावरील भारतीय वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लावल्याचे ट्रम्प सातत्याने सांगत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना फोन न केल्याने भारतासोबत व्यापार करार होऊ शकला नाही, असे अमेरिकेचे वाणिज्यमंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी म्हटले आहे. या कराराच्या आराखड्यात ५० टक्के टॅरिफच्या समाधानाचाही मुद्दा होता.
भारत यासाठी असहज होता आणि मोदींनी फोन केला नाही, म्हणून...एका पॉडकास्टमध्ये बोलताना लुटनिक म्हणाले, "या कराराला अंतिम रूप देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना फोन करावा, अशी विनंती लुटनिक यांनी केली होती. मात्र, भारत यासाठी असहज होता आणि मोदींनी फोन केला नाही. म्हणून, दोन्ही देशांमधील सहा फेऱ्यांच्या चर्चेनंतरही हा करार पूर्ण होऊ शकला नाही. दरम्यान अमेरिकेने इंडोनेशिया, फिलीपीन्स आणि व्हिएतनामसारख्या देशांशी व्यापार करार पूर्ण केले.
यासंदर्भात पुढे बोलताना लुटनिक म्हणाले, भारत आधी करार करेल अशी अपेक्षा होती. यामुळे संबंधित देशांसोबत उच्च दराने करार झाले. मात्र, भारताकडून वेळेत प्रतिसाद आला नाही. यानंतर, जेव्हा भारताने संपर्क साधला आणि 'ठीक आहे, आम्ही तयार आहोत', असे सांगितले, तेव्हा आपण त्यांना, 'आता कशासाठी तयार आहात?" असा प्रश्न करत नाराजी व्यक्त केली.
Web Summary : A US trade official claims Modi's call to Trump might have resolved tariff disputes. A trade deal failed because India was hesitant, leading America to finalize agreements with other nations.
Web Summary : अमेरिकी व्यापार अधिकारी का दावा है कि मोदी का ट्रम्प को फोन टैरिफ विवादों को हल कर सकता था। भारत की झिझक से व्यापार सौदा विफल रहा, जिससे अमेरिका ने अन्य देशों के साथ समझौते किए।