शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चीन आणि अमेरिकेमध्ये २०२५ मध्ये युद्ध झाल्यास कोण जिंकणार? आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 12:04 IST

US Vs China: अमेरिकन सैन्याने काल चीनच्या एका हेरगिरी करणाऱ्या फुग्याला नष्ट केल्यापासून या दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. तसेच दोन्ही देशांमधील तणाव युद्धापर्यंत जाण्याची भीती वर्तवली जात आहे.

नवी दिल्ली - अमेरिकन सैन्याने काल चीनच्या एका हेरगिरी करणाऱ्या फुग्याला नष्ट केल्यापासून या दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. तसेच दोन्ही देशांमधील तणाव युद्धापर्यंत जाण्याची भीती वर्तवली जात आहे. यूएस एअरफोर्सच्या एअर मोबिलिटी कमांडचे प्रमुख माइक मिनिहॅन यांच्या एका लीक मेमोमद्ये दोन्ही देशांमधील तणाव स्पष्टपणे दिसून येत होता. हा मेमो लीक झाल्यापासून चीन आणि अमेरिकेमध्ये युद्धाबाबत विविध प्रकारच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, २०२५ मध्ये या दोन्ही महासत्तांमध्ये युद्ध झाल्यास कुणाचं पारडं जड ठरेल, कोण युद्धात बाजी मारेल, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांची ताकद पुढीलप्रमाणे आहे.

द सन युके ने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडे सध्या १३ लाख सैनिक आहेत. तर चीनकडे २० लाख सैनिक आहेत. त्यामुळे लष्करी शक्तीमध्ये चीनचे पारडे जड आहे. मात्र हवाई ताकदीमध्ये अमेरिका वरचढ दिसते. अमेरिकेकडे १३ हजार ३०० लढाऊ विमाने आहेत. या तुलनेत चीन खूप मागे आहे. चीनकडे ३२०० लढाऊ विमाने आहेत. रणगाड्यांचा विचार केल्यास अमेरिकेकडे ५५०० रणगाडे आहेत. तर चीनकडे ४९५० रणगाडे आहेत.

दोन्ही देशांमधील सागरी शक्तीचा विचार केल्यास अमेरिकेकडे ४२८ युद्धनौका आहेत. याबाबतीत चीन अमेरिकेपेक्षा वरचढ आहे. चीनजवळ सध्या ७३० युद्धनौका आहेत. अण्वस्रांच्या विचार केल्यास अमेरिकेकडे तब्बल ५ हजार ४२८ अण्वस्रे आहेत. चीनजवळ ३५० अण्वस्रे आहेत.

चीन आणि अमेरिकेच्या लष्करी ताकदीवर खर्चाचा विचार केल्यास अमेरिका आपल्या लष्करी शक्तीवर ८५८ बिलियन डॉलर खर्च करत आहे. तर चीन लष्करी शक्तीवर २६१ बिलियन डॉलर खर्च करतात. चीनच्या तुलनेत अमेरिका लष्करी शक्तीवर चार पट अधिक खर्च करते.  मात्र अमेरिका सध्या आपल्या संरक्षण बजेटशिवाय युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवढा करत आहे. तसेच तैवानला मदतीसाठीही वेगळी तरतूद करण्यात आली आहे.  

टॅग्स :warयुद्धUnited Statesअमेरिकाchinaचीन