ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लूला डी सिल्वा यांनी, दक्षिण अमेरिकेतील वाढता तणाव आणि व्हेनेझुएलावर घोंगावणारे युद्धाचे ढग, या पार्श्वभूमीवर अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. "व्हेनेझुएलामध्ये कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई संपूर्ण लॅटिन अमेरिकेसाठीच घातक ठरेल," असा इशारा त्यांनी दिला आहे. ते शनिवारी पार पडलेल्या ६७ व्या 'मर्कोसुर' शिखर परिषदेत बोलत होते.अमेरिकेने वेनेझुएलावर वाढवलेला लष्करी दबाव आणि विशेषतः कॅरिबियन समुद्रातील नौदलाची नाकेबंदी यावर लूला यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "अमेरिकेची धमकी, नौदलाची नाकेबंदी आणि कॅरिबियन देश व्हेनेझुएलावरील सैन्य उपस्थिती हा अत्यंत चिंतेचा विषय आहे." सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लूला यांनी, हा बाह्य शक्तींचा हस्तक्षेप असल्याचे म्हटले आहे. यामुळे संपूर्ण लॅटिन अमेरिकेला धक्का बसला आहे.
लूला डी सिल्वा म्हणाले, "दक्षिण अमेरिकेसाठी शांतता आणि समृद्धी हाच योग्य मार्ग आहे. अंतरराष्ट्रीय कायद्यांची पहीक्षा घेतली जात आहे. व्हेनेझुएलातील सशस्त्र हस्तक्षेप हा संपूर्ण खंडासाठी मानवीय मानवीय आपत्ती ठरेल आणि जगासाठी एक खतरनाक उदाहरण ठरेल.
राष्ट्राध्यक्ष लूला यांनी अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी "लष्करी संघर्षापेक्षा संवाद आणि सामोपचाराचा मार्ग अधिक प्रभावी आणि कमी नुकसानीचा ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला अमेरिकेने वेनेझुएलाला, येणाऱ्या आणि जाणाऱ्या तेल टँकर्सवर बंदी घातली असून, निकोलस मादुरो सरकारला 'विदेशी दहशतवादी संघटना' घोषित केले आहे. एवढेच नाही तर, ट्रम्प यांनी एका मुलाखतीत, अमेरिका अतिरिक्त तेल टँकर्स जप्त करणे सुरूच ठेवेन, असेही म्हटले आहे.
दरम्यान, लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांनी अमेरिकेच्या या भूमिकेचा निषेध केला असून, संयुक्त राष्ट्रांनी यामध्ये तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
Web Summary : Brazilian President Lula da Silva cautioned the US against military intervention in Venezuela, deeming it catastrophic for Latin America. He urged dialogue over conflict, while the US tightens sanctions and labels Maduro's government a terrorist organization.
Web Summary : ब्राजील के राष्ट्रपति लूला डी सिल्वा ने वेनेजुएला में सैन्य हस्तक्षेप के खिलाफ अमेरिका को चेतावनी दी, इसे लैटिन अमेरिका के लिए विनाशकारी बताया। उन्होंने संघर्ष पर बातचीत का आग्रह किया, जबकि अमेरिका ने प्रतिबंध कड़े किए और मादुरो सरकार को आतंकवादी संगठन बताया।