इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेचे इस्रायलला पूर्ण समर्थन असून ते इस्रायलच्या समर्थनार्थ मिलिट्री मददही पाठवू शकतात, असे मानले जात आहे. मात्र, यातच आता रशियाचीही या युद्धात एम्ट्री झाली आहे. रशियानेइराणचे समर्थन करत अमेरिकेला खुली धमकी दिली आहे.
यामुळे, आतापर्यंत एकाकी पडलेल्या इराणला आता रशियाची मदत मिळत आहे. 'जर अमेरिकेने इस्रायलला थेट लष्करी मदत केली, तर मध्य पूर्वेतील परिस्थिती अस्थिर होण्यास वेळ लागणार नाही, असी धमकी रशियाने अमेरिकेला दिला आहे.
ट्रम्प यांना रशियाचा इशारा -एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, "आम्ही, या संघर्षात लष्करी हस्तक्षेपासंदर्भात अमेरिकेला इशारा देऊ इच्छीतो. जर असे झाले, तर याचे परिणाम भयंकर होतील," असे रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोवा यांनी म्हटले आहे.
जखारोवा म्हणाल्या, "इस्रायल इराणच्या न्युक्लियर इंफ्रास्ट्रक्चरवर ज्या पद्धतीने हल्ले करत आहे, याचा अर्थ जग विनाशापासून केवळ काही मिलीमीटर दूर आहे. जागतिक समुदाय कुठे आहे? पर्यावरणवादी कुठे आहेत? त्यांना असे वाटते का की, रेडिएशन त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही?" दरम्यान, रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्गेई रियाबको यांनीही अमेरिकेला याच पद्धतीचा इशारा दिला आहे.
महत्वाचे म्हणजे, अमेरिका इराण विरोधात मोठी अॅक्शन घेण्याची तयारी करत आहे. यापूर्वी, खामेनेई यांनी फार उशीर केला आहे, असे ट्रम्प यानी म्हटले होते. हल्लासंदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देत ते म्हणाले होते, आम्ही हल्ला करूही शकतो आणि नाहीही.