शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

रशियाला जी-7 मध्ये बघू इच्छितो, बाहेर करणे एक चूक होती...! ट्रम्प यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 02:47 IST

"रशियाला पुन्हा जी 7 मध्ये बघायला आपल्याला आवडेल," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वॉशिंग्टन डीसी येथे बैठक होणार आहे. ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतरची ही दोन्ही नेत्यांची पहिलीच भेट आहे. व्हाईट हाऊसमध्ये होत असलेल्या या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. महत्वाचे म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर अनेक महत्त्वाच्या घोषणाही होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी रशियासंदर्भात मोठे विधान केले आहे. "रशियाला पुन्हा जी 7 मध्ये बघायला आपल्याला आवडेल," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.  पत्रकारांसोबत बोलताना ट्रम्प म्हणाले, "आपण रशियाला पुन्हा G7 मध्ये बघू इच्छितो. यामुळे, रशियाला पुन्हा जी-7 मध्ये आणायला आपल्याला आवडेल. रशियाला जी7 मधून बाहेर करणे एक चूक होती." मॉस्कोच्या क्रिमियावरील हल्ल्यानंतर, २०१४ मध्ये रशियाला बाहेर करण्यात आले होते. दरम्यान, रशियाला पुन्हा सामील होण्याची परवानगी द्यायला हवी, असे ट्रम्प यांनी वारंवार म्हटले आहे.

ब्रिक्स देशांना 100 टक्के टॅरिफची धमकी -ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना 100 टक्के टॅरीफची धमकी दिली आहे. व्हाइट हाऊस येथे पत्रकारांसोबत बोलताना, "ब्रिक्स देश 'डॉलरसोबत खेळले तर' त्यांना 100 टक्के टॅरिफचा सामना करावा लागेल."

परस्पर शुल्क लागू करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी -राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी व्यापारी भागीदारांकडून होणाऱ्या आयातीवर परस्पर शुल्क लागू करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. याचा अर्थ अमेरिकेत कुठल्याही देशाच्या आयात वस्तूवर तेवढाच कर लावला जाईल, जेवढा संबंधित देशात अमेरिकन वस्तूच्या आयातीवर लावला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात घोषणा केली. विशेष म्हणजे भारतात जवळजवळ इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक कर आहे असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पrussiaरशियाNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका