गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये आपला कौंटुंबिक व्यवसाय वाढविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात टेरिफ वॉर सुरु केले होते. याचा परिणाम असा झाला की जगातील तीन महाशक्ती एकत्र आल्या आहेत. भारत, रशिया आणि चीन यांच्यात नुकतीच मोठी बैठक पार पडली. यावरून आता डोनाल्ड ट्रम्प यांना भीती वाटू लागली आहे. भारत आणि रशियाबाबत ट्रम्प यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
अमेरिकेने भारत आणि रशिया यांना चीनमुळे गमावले असे वाटत असल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत. आपण भारत आणि रशियाला चीनच्या सर्वात खोल आणि अंधाऱ्या छावणीत गमावले आहे. आशा आहे की त्यांचे संबंध दीर्घ आणि समृद्ध राहतील, अशी पोस्ट त्यांनी त्यांचा सोशल मीडिया ट्रूथवर केली आहे. सोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा फोटो पोस्ट केला आहे.
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेसाठी हे तिन्ही नेते नुकतेच भेटले होते. आता रशिया, चीन आणि भारत एकत्र येत असल्याने अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाल्याचे ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट दिसू लागले आहे. भारत गेल्या काही काळापासून रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहे. अख्खा युरोपही रशियाकडून आपली गरज भागवत आहे. परंतू, ट्रम्प यांना भारत डोळ्यात खुपत आहे. यामुळेच त्यांनी भारतावर २५ टक्के टेरिफ लावताना दंड म्हणून आणखी २५ टक्के टेरिफ लादले आहे. सोबतच भारत-पाकिस्तानमध्ये सुरु झालेले युद्ध देखील मीच थांबविल्याच्या टिमक्या मारत आहेत. अमेरिकेला आता या गोष्टींचे परिणाम भोगण्याची वेळ आलेली आहे.