शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 23:24 IST

ईडीने पाठवलेल्या समन्सला मी हजर झालो नाही, परंतु मी त्यांना उत्तर पाठवले होते. मी भारतात परतेन, परंतु मला थोडा वेळ हवा असं कळवल्याचं मल्ल्याने म्हटलं.

हजारो कोटींची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फरार आरोपी उद्योजक विजय मल्ल्या याने भारतात परतण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे विधान केले आहे. जर भारतीय तपास यंत्रणांकडून निष्पक्ष खटल्याची हमी दिली गेली तर भारतात परतण्यावर विचार करू असं त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे. इंडियन युट्यूबर राज शमामी यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत मल्ल्या याने त्याच्यावरील आरोपांवर भाष्य केले. 

उद्योजक विजय मल्ल्या म्हणाला की, जर मला भारतात निष्पक्ष खटल्याची हमी आणि सन्मानजनक वागणूक मिळाली तर मी भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन. त्याशिवाय तुम्ही मला फरार म्हणू शकता, परंतु मी पळून गेलो नाही. माझ्या पूर्वनियोजित भेटीसाठी मी उड्डाण घेतले होते. मी ज्या कारणांसाठी परतलो नाही ते योग्य आहे. त्यामुळे जर तुम्ही मला फरार म्हणत असाल तर म्हणा, पण चोर कुठून आला, चोरी कुठे आहे? असा सवाल त्याने उपस्थित केला. 

तसेच ईडीने पाठवलेल्या समन्सला मी हजर झालो नाही, परंतु मी त्यांना उत्तर पाठवले होते. मी भारतात परतेन, परंतु मला थोडा वेळ हवा. मला बँकांचे कर्ज फेडण्यासाठी पैशांची व्यवस्था करायची होती मात्र त्यांनी माझा पासपोर्ट रद्द केला. मी माझी कायदेशीर लढाई लढत आहे. मी इंग्लंडमध्ये अधिकृतपणे राहत आहे. इथेही मी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत आहे. ईडी, सीबीआय यांचा इतिहास पाहिला तर मला त्यांच्याबाबत खात्री वाटत नाही. माझ्यावर त्यांनी जे आरोप लावले ते बिनबुडाचे आहेत असा आरोपही विजय मल्ल्याने केला.

दरम्यान, अलीकडेच किंगफिशर एअरलाइन्सविरुद्धच्या कर्जवसुली प्रक्रियेला विजय मल्ल्यानं कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिलं होते. किंगफिशर एअरलाइन्सवर जवळपास ६२०० कोटी रुपयांचं कर्ज होतं असा दावा मल्ल्याने केला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीच्या कर्जाच्या रकमेपेक्षा कितीतरी जास्त रक्कम वसूल केली असल्याचं त्याचे म्हणणं आहे. ही याचिका ३ फेब्रुवारी २०२५ रोजी दाखल करण्यात आली होती. 

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्या