शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवरे राहतील, बायकांनी देश सोडावा! नव्या सरकारचा अजब नियम, नागरिक भलतेच संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 11:40 IST

नवीन सरकार सत्तेवर आलं की जुन्या सरकारचे नियम बदलायचे किंवा रद्द करायचे, त्याच्या अगदी विपरीत निर्णय घ्यायचे, असे प्रकार संपूर्ण जगभरातच चालतात.

नवीन सरकार सत्तेवर आलं की जुन्या सरकारचे नियम बदलायचे किंवा रद्द करायचे, त्याच्या अगदी विपरीत निर्णय घ्यायचे, असे प्रकार संपूर्ण जगभरातच चालतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपानं सगळ्या जगानं नुकतंच ते अनुभवलंही.

आपल्या देशात ‘बेकायदेशीरपणे’ राहणाऱ्या नागरिकांना तिथून हाकलणं हा बहुदा सगळ्याच देशांचा सध्याचा अग्रक्रम असावा. कुवैतमध्ये आता तेच सुरू आहे. कुवैतमध्ये नुकतंच नवीन सरकार सत्तेवर आलं आहे. सत्तेवर येताच त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे अनेकांचं धाबं दणाणलं आहे. मिशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबा हे कुवैतचे नवे अमीर आहेत. त्यांनी नुकतेच काही निर्णय घेतले. त्यामुळे कुवैतमध्ये असलेल्या अनेक परदेशी नागरिकांचं तिथलं अस्तित्व आता संपेल. अमीर मिशाल सध्या ८४ वर्षांचे आहेत. सत्तेवर येताच त्यांनी जाहीर केलं होतं, देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांना ते देशातून हाकलून लावतील. त्यानुसार लगेचच त्यांनी कुवैतमध्ये राहणाऱ्या ४२ हजार जणांचं नागरिकत्व रद्द केलं. पण त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फटका खुद्द त्यांच्याच देशातील नागरिकांनाही बसतो आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत आणि त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

ज्यांनी बेकायदेशीरपणे कुवैतचं नागरिकत्व मिळवलेलं आहे आणि ज्यांचं नागरिकत्व रद्द करण्यात आलं आहे, त्यात कुवैतच्या अनेक महिलांचा समावेश आहे. काही परदेशी महिलांनी कुवैती पुरुषांशी लग्न केल्यानंतर त्यांना कुवैतचं नागरिकत्व मिळालं, त्यांचंही नागरिकत्व या नियमामुळे काढून घेण्यात आलं आहे. त्यामुळे अशा कुटुंबीयांवर मोठीच आफत ओढवली आहे. या कुुटुंबातील पुरुषांच्या बायकांना आता कुवैत सोडून जावं लागणार आहे. त्यामुळे अशा कुटुंबीयांत मोठी घबराट पसरली आहे. नागरिकत्व रद्द केलेल्या या महिलांना आता कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ तर मिळणार नाहीच, पण त्यांच्या मुलांनाही शिक्षण, आरोग्यसेवा व इतर सामाजिक सेवांपासून वंचित राहावं लागण्याची भीती निर्माण झाली आहे. 

आपल्याच देशाच्या नागरिकांचं आयुष्य धोक्यात आणण्याचा निर्णय आपलंच सरकार कसं घेऊ शकतं, यावरून कुवैतमध्ये आता प्रचंड नाराजी पसरली आहे. 

कुवैतमध्ये बिदून समुदायाचे सुमारे एक लाख नागरिक राहतात. कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय त्यांनी कुवैतमध्ये प्रवेश केला आहे असं म्हटलं जात आहे. त्यांचंही नागरिकत्व आता रद्द होणार आहे. गेल्या सहा महिन्यांत सरकारनं तब्बल ४२ हजार जणांचं नागरिकत्व रद्द केलं आहे. मे २०२४ मध्ये अमीर यांनी कुवैतची संसद बरखास्त केली होती. घटनादुरुस्ती करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्यानंतर सरकारनं विरोधकांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली. विरोधी खासदारांपासून तर सर्वसामान्य माणसांपर्यंत अनेकांना अटक करण्यात आली. अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनीही या दडपशाहीचा विरोध केला, पण अमीर मिशाल यांनी त्यांच्या विरोधाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. आता आपल्याच देशातील पुरुषांना त्यांच्या पत्नींपासून दूर करण्याच्या त्यांच्या कृतीचा प्रखर विरोध होतो आहे. त्यानंतर तरी ते आपला निर्णय बदलतात का, याकडे आता साऱ्यांचंच लक्ष लागलं आहे.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीhusband and wifeपती- जोडीदार