पोपटामुळे पत्नीला समजले पतीचे अनैतिक संबंध
By Admin | Updated: October 26, 2016 18:00 IST2016-10-26T17:36:36+5:302016-10-26T18:00:43+5:30
घरात पाळलेले पाळीव प्राणी नेहमी मालकाच्या मदतीला धावून येतात. पण कुवेतमध्ये घरात पाळलेल्या पोपटाने चक्क मालकाचेच अनैतिक..

पोपटामुळे पत्नीला समजले पतीचे अनैतिक संबंध
ऑनलाइन लोकमत
हवाली, दि. २६ - घरात पाळलेले पाळीव प्राणी नेहमी मालकाच्या मदतीला धावून येतात. पण कुवेतमध्ये घरात पाळलेल्या पोपटाने चक्क मालकाचेच अनैतिक संबंध उघड केले. सुदैवाने पोपटाचा पुरावा ग्राहय धरत नसल्याने हा मालक तुरुंगात जाण्यापासून बचावला.
कुवेतमध्ये रहाणा-या एका दांम्पत्याने घरकामासाठी एक बाई ठेवली होती. पत्नी घरात नसली की, पतीच्या घरकामासाठी ठेवलेल्या महिलेबरोबर प्रेमसंबंधांना बहर यायचा. एकांतात दोघांमध्ये जो संवाद चालायचा. त्यातील काही शब्द या पोपटाने ऐकले होते.
हेच शब्द हा पोपट पत्नीसमोर वारंवार उच्चारु लागला. त्यावेळी पती आणि घरकामासाठी ठेवलेल्या बाईमधील अनैतिक संबंध उघड झाले असे वृत्त अरब टाइम्सने दिले आहे.
त्यानंतर पत्नीने कुवेतच्या हवाली पोलिस स्थानकात पतीविरोधात तक्रार दाखल केली. तिने पतीवर फसवणुकीचा आरोप केला. पण सबळ पुराव्याअभावी कोर्टात गुन्हा सिद्ध करणे शक्य नसल्याचे तपास अधिका-याने सांगितले. त्यामुळे पती तुरुंगात जाण्यापासून बचावला.