शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या मोबाइलमधले दुस-या व्यक्तीने पाठवलेले मेसेज पाहून संतापलेल्या पतीने कु-हाडीने कापले हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 13:59 IST

रशियामध्ये संतापाच्या भरात पतीने कु-हाडीचा वार करुन पत्नीचे हात कापल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, पत्नीच्या मोबाइलवर दुस-या व्यक्तीने पाठवलेले मेसेज पाहिल्याने त्याचा संताप झाला, आणि या क्षुल्लक कारणावरुन त्याने पत्नीवर हल्ला करत तिचे हात कापले.

ठळक मुद्देरशियामध्ये संतापाच्या भरात पतीने कु-हाडीचा वार करुन पत्नीचे हात कापल्याची घटनापत्नीच्या मोबाइलवर दुस-या व्यक्तीने पाठवलेले मेसेज पाहिल्याने पती संतापला होतापोलिसांनी आरोपी पती ड्मित्री ग्राचयोवाला अटक केली आहे

मॉस्को - रशियामध्ये संतापाच्या भरात पतीने कु-हाडीचा वार करुन पत्नीचे हात कापल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, पत्नीच्या मोबाइलवर दुस-या व्यक्तीने पाठवलेले मेसेज पाहिल्याने त्याचा संताप झाला, आणि या क्षुल्लक कारणावरुन त्याने पत्नीवर हल्ला करत तिचे हात कापले. मेसेज पाठवणा-या व्यक्तीला त्याची पत्नी आवडत होती. महिलेने या घटनेआधी त्याच्या धमक्या आणि मारहाणीला कंटाळून घटस्फोट मागितला होता. नेहमी होत असणा-या भांडणांमुळे दोघे वेगळे राहत होते. हल्ला केल्यानंतर पती तिला घेऊन रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी उपचार करत एक हात पुन्हा बसवण्यात यश मिळवलं. पण दुसरा हात ते वाचवू शकले नाहीत. 

25 वर्षीय मार्गरिटा दोन मुलांची आई आहे. तिचा पती ड्मित्री ग्राचयोवा एक मानसशास्त्रज्ञ आहे. फक्त आणि फक्त इर्षेपोटी त्याने हा हल्ला केला. हल्ल्यात मार्गरिटाच्या बोटाला आणि खांद्याला जबर जखमा झाल्या आहेत. 'मी त्याच्याकडे घटस्फोट मागितला होता. यामुळेच त्याचा प्रचंड संताप झाला होता', असं त्यांनी सांगितलं आहे. झालेल्या घटनेबद्दल सागंणं आपल्यासाठी खूपच वेदना देणारं असल्याचं त्या वारंवार सांगत होत्या.

पोलिसांनी आरोपी पती ड्मित्री ग्राचयोवाला अटक केली आहे. त्याला फेब्रुवारी महिन्यापर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने कबूल केलं आहे की, 'मुलांना शाळेत सोडल्यानंतर आपण पत्नीला घेऊन जंगलात गेलो होतो. तिथेच कु-हाडीने हल्ला करत तिचे हात कापले'. 

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी कु-हाड पकडण्याच्या बाजूने पत्नीची बोटं ठेचून काढली आणि नंतर दोन्ही हात कापले. हल्ल्यानंतर पत्नीला  रुग्णालयात दाखल केलं आणि स्वत:ला पोलिसांच्या हवाली केलं. याआधीही आरोपी पतीने घटस्फोटाचा विचार सोडून दे सांगत चाकूने हल्ला केला होता. आरोपीने चेह-यावर अॅसिड फेकण्याची धमकीही दिली होती. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस