कारागृहातून शेकडो कैदी फरार

By Admin | Updated: September 29, 2015 23:01 IST2015-09-29T23:01:11+5:302015-09-29T23:01:11+5:30

सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन या देशात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात किमान ३० जण ठार झाले असून कारागृहातून शेकडो कैदी फरार झाले आहेत.

Hundreds of prisoners absconding from jail | कारागृहातून शेकडो कैदी फरार

कारागृहातून शेकडो कैदी फरार

बंगुई : सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन या देशात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात किमान ३० जण ठार झाले असून कारागृहातून शेकडो कैदी फरार झाले आहेत. नगरावा या कारागृहात आता एकही कैदी उरलेला नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
निदर्शने करणाऱ्या शेकडो लोकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला.
शनिवारी एका मुस्लिम युवकाचा मृतदेह सापडल्यानंतर हिंसाचाराला प्रारंभ झाला.

Web Title: Hundreds of prisoners absconding from jail