शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

माणुसकी! भारत युद्धग्रस्तांच्या मदतीला धावला! पॅलेस्टाइनला पाठवली ३० टनची वैद्यकीय मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 13:49 IST

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ट्विटरवरून पोस्ट करून दिली माहिती

India helps Palestine: इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्ध आणि वाद सध्या तरी शमण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. या युद्धाबाबत भारताने वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे. मध्यपूर्वेतील हे युद्ध थांबवण्यासाठी भारताने 'द्वि-राष्ट्र' चर्चेचा प्रस्तावही ठेवला आहे. इस्रायल भारताचा मित्र आहे तसेच भारताचे पॅलेस्टाईनशीही मजबूत नाते आहे. यामुळेच भारताने पॅलेस्टाईनला कठीण काळात मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने पॅलेस्टाईनमधील युद्धग्रस्तांना वैद्यकीय मदत सामग्री पाठवली आहे. भारताने पॅलेस्टाईनला जीवनरक्षक आणि कर्करोगविरोधी औषधांसह ३० टन वैद्यकीय पुरवठा पाठवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विटरवरून पोस्ट करून ही माहिती दिली.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून भारत गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टाइनच्या नागरिकांना मदत करण्यासाठी मदत साहित्य पाठवत आहे. गेल्या वर्षी भारताने पॅलेस्टाईनला $३५ मिलियनची आर्थिक मदत पाठवली होती. तर या वर्षी जुलैमध्ये भारताने संयुक्त राष्ट्र मदत आणि कार्य संस्था (UNRWA) ला $२५ दशलक्षचा पहिला हप्ता जारी केला होता.

याशिवाय, २२ ऑक्टोबर रोजी मोदी सरकारने पॅलेस्टाईनच्या मदतीसाठी ३० टन वैद्यकीय मदत सामग्री देखील पाठवली होती. ज्यात औषधे, शस्त्रक्रिया वस्तू, दंत उत्पादने, उच्च-ऊर्जा बिस्किटे आणि इतर अनेक आवश्यक वस्तूंचा समावेश होता. हे यूएन रिलीफ आणि गाझामधील पॅलेस्टाइनच्या निर्वासितांसाठी काम करणारी एजन्सी UNRWA द्वारे वितरित केले जात आहे.

भारताने पाठवलेली मदत सामग्री प्रथम इजिप्तला पाठवली जाते. तेथून राफा सीमेवरून हे सामान गाझामधील लोकांमध्ये वितरित करणाऱ्या यूएन एजन्सींना दिले जाते.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsraelइस्रायलPalestineपॅलेस्टाइनIndiaभारत