शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मानवी अस्तित्वालाच ‘एआय’मुळे धोका?; यूनोच्या सुरक्षा परिषदेत १८ जुलैला विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2023 06:42 IST

अण्वस्त्रांच्या नियंत्रणासाठी एआयचा होणारा संभाव्य वापर व त्यातील जोखीम इत्यादी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल.

संयुक्त राष्ट्र : कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एएआय) नव्या तंत्रज्ञानामुळे पुढील काळात जगावर नेमके काय परिणाम होणार अशी प्रत्येकाच्या मनात भीती आहे. लोकांच्या मनात याबाबत कमालीची उत्सुकता आहे. एआयमुळे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत  संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) सुरक्षा परिषदेत प्रथमच चर्चा होणार आहे. त्यासाठी १८ जुलैला एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अण्वस्त्रांच्या नियंत्रणासाठी एआयचा होणारा संभाव्य वापर व त्यातील जोखीम इत्यादी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल. (वृत्तसंस्था)

माणूस परावलंबी होईल‘शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी एआयची आण्विक युद्धाच्या धोक्याशी तुलना केली आहे. एआयमुळे निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी जगाने वेळीच उपाययोजना केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले असल्याचे अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले होते. एआयच्या वापरामुळे माणूस अधिक परावलंबी होईल.

माणसाची सर्जनशीलता नष्ट हाेईल?माणसाचा मेंदू हा एक प्रकारचे जैविक यंत्रच आहे, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. यंत्राप्रमाणे माणसाच्या नैसर्गिक उत्क्रांतीलाही काही मर्यादा आहेत, असे म्हटले जाते. एआयचा वापर करून स्वयंविकास साधण्याचे प्रशिक्षण मिळालेली यंत्रे मानवजातीस कायमचे नष्ट करू शकतील किंवा गुलाम बनवतील, असे शास्त्रज्ञांना वाटते. एआयमुळे माणसाची विचारशक्ती संपण्याचा तसेच त्याची सर्जनशीलता संपुष्टात येण्याची ही शक्यता वर्तविली जाते. एआयचा भविष्यात पगडा वाढल्यास विविध शस्त्रांचा अनिर्बंध वापर वाढण्याचीही भीती आहे.एआयशी संबंधित अशा अनेक मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत चर्चा होणार आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय