शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:24 IST

दरम्यान, इजरायली हल्ल्यात आतापर्यंत ईराणचे टॉप 20 लष्करी कमांडर मारले गेले आहेत. याशिवाय सुप्रिम लिडर अयातुल्लाह खामेनेई यांचेही दोन जवळचे लोक मारले गेले आहेत.

israel attacks killed 585 irani people leaving tehran long queues in road

इस्रायल आणि इराणमध्ये भयंकर युद्ध पेटले आहे. इस्रायलच्या हल्ल्यांत आतापर्यंत इराणचे ५८५ जण मारले गेले आहेत. तर १,३२६ जण जखमी झाले आहेत. अमेरिकास्थित मानवाधिकार गटाच्या माहितीनुसार, इस्रायली हल्ल्यांमध्ये २३९ इराणी नागरिक मारले गेले आहेत, तर १२६ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बुधवारीही सकाळपासूनच दोन्ही देशांकडून हल्ले सुरू आहेत. याशिवाय आता इराणने सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापरही सुरू केला आहे. महत्वाचे म्हणजे, शक्यतो इराण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची माहिती शेअर करत नाही, मात्र, त्याने सोमवारी दिलेल्या डेटानुसार, तेव्हापर्यंत एकूण २२४ जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय १२७७ जण जखमी झाले होते.

इराण-इस्रायल युद्धाला ६ दिवस झाले आहेत. अद्यापही युद्ध सुरूच आहे. सध्यातही युद्ध थांबेल असे दिसत नाही. इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीवला लक्ष्य केले आहे. मात्र, त्यांनी केलेल्या हल्ल्यात इस्रायलचे फार नुकसान झालेले नाही. या उलट इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. एवढेच नाही तर, येथे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, येथे राहणारे परदेशी लोक, देश सोडून जात आहेत. नव्हे, इराणी लोकही लवकरात लवकर तेहरान सोडण्याच्या तयारीत आहेत. पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. लोक त्यांच्या वाहनांमध्ये सामान भरून कसे तरी बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, इजरायली हल्ल्यात आतापर्यंत ईराणचे टॉप 20 लष्करी कमांडर मारले गेले आहेत. याशिवाय सुप्रिम लिडर अयातुल्लाह खामेनेई यांचेही दोन जवळचे लोक मारले गेले आहेत.

आपण इराणला अणवस्त्रे तया करण्यापासून रोखण्यासाठी हे हल्ले करत आहोत, असे इस्रायलने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, अमेरिका आणि इराण यांच्यात अण्वस्त्र करारासंदर्भात चर्चा सुरू असतानाच इस्रायलने हल्ले सुरू केले. गेल्या आठवड्यातच अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा होणार होती. याशिवाय, आपला अणु कार्यक्रम शांतीपूर्ण असल्याचे इराणने वारंवार म्हटले आहे. मात्र तो एकमेव असा बिगर-अणु संपन्न देश आहे, ज्याने 60 टक्क्यांपर्यंत युरेनियम मिळवले आहे. अण्वस्त्र तयार करण्यासाठी युरेनियम ग्रेड लेवल 90 टक्क्यांपर्यंत असणे आवश्यक असते.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध