Los Angeles wildfire : अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस शहरात लागलेल्या भयंकर आगीमध्ये आतापर्यंत हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या भीषण घटनेत अनेक जणांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले असून २४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जवळपास गेल्या आठवड्याभरापासून लॉस एंजेलिस शहर आगीमध्ये धुमसत आहे. मात्र कॅलिफोर्निया येथील जंगलात लागलेल्या आगीत मालिबू येथील एक घर चमत्कारिकरित्या बचावले आहे. वणव्यातून बचावलेल्या या घराची चर्चा सध्या जगभरात सुरु आहे.
कॅलिफोर्नियातील वणव्यांमध्ये मार्गात येणारे सर्व काही गिळंकृत झालं आहे. इथली जंगले आणि परिसर कोळशामध्ये बदलू गेला आहे. मात्र मालिबूमधील ९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे तीन मजली घर अजूनही शाबूत असल्याचे समोर आलं आहे. ज्वाला शांत झाल्यानंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये हे घर दिसून येत आहे. मात्र त्याच्या शेजारील शेजारील घरांसह, जळून खाक झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
घरमालकाने दिलेल्या माहितीनुसार आजूबाजूला धूर निघत असताना आमचे घर अजूनही उभे असल्याचे पाहून मी थक्क झालो. मालिबू येथे असलेल्या या घराच्या मालकाचे नाव डेव्हिड स्टेनर आहे. डेव्हिड स्टाइनर हे टेक्सासमधील निवृत्त कचरा-व्यवस्थापन कार्यकारी आहेत. डेव्हिड स्टेनर यांनी हा एक चमत्कार असल्याचे म्हटलं आहे.
डेव्हिड स्टेनर यांनी सांगितले की. "तिथल्या एका व्यक्तीने मला व्हिडीओ पाठवला होता ज्यामध्ये माझ्या आणि शेजारच्या घराशेजारी आगीचे आणि धुराचे साम्राज्य होतं. त्यामुळे माझंही तीनमजली घर जळून खाक होईल असं वाटलं होतं. त्यावेळी घरात कोणीही नव्हतं. व्हिडीओ पाठवणाऱ्या व्यक्तीने बातम्या बघून सांगितले की, तुझ्या शेजारचे घर जळत आहे तुझे घरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल असं वाटत आहे."
"आजूबाजूची परिस्थिती पाहून असे वाटत होते की आपण घर गमावले आहे. पण सगळे जण फोन करुन तुमच्या घराच्या बातम्या दाखवल्या जात आहेत असं म्हणू लागले. मला फोटो मिळू लागले आणि मला समजले की आपण योग्य घर बनवलं आहे. माझ्या पत्नीने मला 'द लास्ट होम' असे काहीतरी पाठवले आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर खूप मोठे हास्य आले," असं डेव्हिड स्टेनर म्हणाले.
डेव्हिड स्टेनर म्हणाले की त्यांचा विश्वास आहे की त्यांच्या मालमत्तेच्या अतिशय मजबूत बांधकामामुळे ते पॅलिसेड्सच्या आगीपासून वाचले होते. हे घर भूकंपापासून संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे प्लास्टर आणि दगडाचे बनलेले आहे आणि त्याला अग्निरोधक छत आहे. हे घर ५० फूट खोल अशा पायावर उभं राहिलं आहे जे शक्तिशाली लाटांविरूद्ध स्थिर राहू शकते.
पॅसिफिक कोस्ट हायवेपर्यंत वणव्याची आग पोहोचेल याची कल्पनाही केली नव्हती असंही स्टेनर म्हणाले. स्टेनर यांचे मालिबू येथील घर ४,२०० चौरस फूटांवर असून त्यात चार बेडरूम आहेत. हे घर त्यांनी एका निर्मात्याकडून विकत घेतले होते. मला लोकांकडून मेसेज येत होते की, 'आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. हे फार भयंकर आहे. मी म्हणालो, 'माझ्यासाठी प्रार्थना करू नका, मी जी गमावले ती भौतिक संपत्ती आहे. मी संपत्ती गमावली, परंतु इतरांनी त्यांची घरे गमावली.'
दरम्यान, कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टी भागात वारंवार चक्रीवादळे, वादळे आणि भूकंप होतात. त्यामुळे बांधकामाच्या बाबतीत लाकूड हे एक महत्त्वाचे बांधकाम साहित्य आहे. या प्रदेशात लाकूड हलके, किफायतशीर आणि सहज उपलब्ध असल्याने, विशेषतः भूकंप होण्याची शक्यता असलेल्या भागात, घरे आणि व्हिला बांधणे सोपे आणि जलद होते, त्यामुळे लाकूड जास्त पसंत केले जाते. मात्र आता यामुळे ही आग धुमसत आहे.