शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अमेरिकेतील शाळा किंवा विद्यापीठ कायदेशीर आहे की नाही, हे कसं ओळखावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 08:24 IST

तुम्ही विविध मार्गांनी अमेरिकेतील कायदेशीर शाळा, विद्यापीठ शोधू शकता.

प्रश्न- अमेरिकेतील शाळा किंवा विद्यापीठ कायदेशीर आहे की नाही, हे मला कसं कळू शकेल?उत्तर- शाळा, कॉलेजचा शोध घेताना तिथे देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधांची माहिती घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सोयी अवास्तव तर वाटत नाही ना, हे तपासून पाहणं आवश्यक आहे. तुम्ही विविध मार्गांनी अमेरिकेतील कायदेशीर शाळा, विद्यापीठ शोधू शकता. देशाबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची परवानगी असलेल्या शाळांची माहिती अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाकडे (https://studyinthestates.dhs.gov/school-search) उपलब्ध आहे. याशिवाय अमेरिकन सरकार आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी इज्युकेशन यूएसए (https://educationusa.state.gov/) ही मोफत सेवा पुरवतं. या ठिकाणी अमेरिकेतील उच्च शिक्षणाच्या यंत्रणेची माहिती उपलब्ध आहे. यासोबतच तुम्ही या सेवेचा वापर करुन 4500 हून अधिक महाविद्यालय, विद्यापीठांमधून हवा तो पर्याय निवडू शकता. या सर्व संस्था कायदेशीर आहेत.विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी कायदेशीर शाळा आणि विद्यापीठ विशिष्ट प्रक्रिया पाळतात. त्यांच्याकडून आवश्यक निकषांची माहिती काटेकोरपणे दिली जाते. तुम्ही त्यांच्या निकषांमध्ये बसत नसाल, तर तुम्हाला प्रवेश दिला जात नाही. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना बऱ्याचदा त्यांच्या सध्याच्या किंवा जुन्या शाळेतून इंग्रजी प्रावीण्य परीक्षा द्यावी लागते. याशिवाय तुमच्या शिक्षकांकडून शिफारस पत्र आणावं लागतं. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमच्या वरिष्ठांकडून तसं पत्र गरजेचं असतं. कायदेशीर शाळा त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमांची, शिक्षकांची, सोयी-सुविधांची विस्तृत माहिती संकेतस्थळांवर देतात. जर तुम्ही एखाद्या शाळेला त्यांच्या अभ्यासक्रमाविषयी किंवा कार्यक्रमांविषयी प्रश्न विचारल्यास, त्यांनी त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. तुम्ही विद्यापीठाची क्रमवारी आणि स्थानिक माध्यमांच्या मदतीनं शाळा, विद्यापीठाबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. ऑनलाइन मॅप सेवेनं विद्यापीठाचं लोकेशन दाखवायला हवं. याशिवाय विद्यापीठाचे, त्याच्या कॅम्पसचे फोटोदेखील दाखवायला हवेत.शाळेची माहिती शोधताना खालील गोष्टी लक्षात आल्यास सतर्क व्हा- - तुम्ही नोकरी करू शकता आणि तुमची वर्गातील उपस्थिती गरजेची नाही, असा दावा एजंट किंवा शाळेकडून केला जात असेल.- जर एजंट किंवा शाळा अवघ्या काही दिवसांत, आठवड्यांमध्ये किंवा महिन्यांमध्ये पदवी देण्याचं आश्वासन देत असेल.- अभ्यासक्रम संपताच लगेचच नोकरी देण्याची हमी दिली जात असेल किंवा नोकरी मिळवण्यासाठी शालेय शिक्षण पूर्ण करण्याची गरज नसल्याचं सांगितलं जात असेल.- प्रवेशासाठी शाळेकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली जात असेल (सामान्य शुल्काच्या व्यतिरिक्त)- तुम्ही उपस्थित केलेल्या शंकांना शाळेकडून समाधानकारक उत्तर दिलं जात नसेल किंवा अभ्यासक्रमाबद्दल उडवाउडवीची उत्तरं दिली जात असतील.- संकेतस्थळाच्या यूआरएलच्या शेवटी '.edu' नसेल, तुम्हाला कॅम्पसचा पत्ता पडताळून पाहता येत नसेल किंवा शाळेचा पत्ता किंवा मेल ऍड्रेस सतत बदलत असेल.- शाळेचं नाव जवळपास दुसऱ्या शाळेप्रमाणेच असेल. केवळ स्पेलिंगमध्ये थोडासा बदल असेल.

टॅग्स :collegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठUSअमेरिका