किस करताना शेन वॉर्न कॅमेऱ्यात कैद...
By Admin | Updated: June 20, 2016 03:34 IST2016-06-19T23:43:47+5:302016-06-20T03:34:48+5:30
नुकताच शेन वार्न एका महिलेसोबत लंडन मध्ये रस्त्यावर किस करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. यापुर्वीही, वार्नचे केवळ अनेक मॉडेल आणि महिलांसोबतच अफेयर

किस करताना शेन वॉर्न कॅमेऱ्यात कैद...
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ : क्रिकेट विश्वात स्टार झालेले खेळाडू वैयक्तीक जिवनात वादाच्या भोवऱ्यात अडकल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता पन्नाशीच्या जवळ पोहोचलेला शेन वॉर्नचेच (47 वर्ष) घ्या. त्याच्या नावावर जसे अनेक विक्रम आहेत, जणू तेवढेच वादही आहेत. आता तो लंडन शहरात ‘पब्लिक प्लेस’मध्ये किस करताना आढला आहे. एवढंच नाही तर त्याचा हे किसप्रकरण कॅमेऱ्यातही कैद झाले आहे आणि त्यामुळंच ते आता अवघ्या सोशल जगातही व्हायरल झालेय.
शेन वार्न नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. मुख्यत: नवनवीन गर्लफ्रेड बनवण्याच्या बाबतीत तो बदनाम आहे. २००० मध्ये वार्नर्शी संबंधित पहिला मामला सामोर आला होता. ब्रिटिश नर्स डोना राइटने वार्नवर अश्लील मेसेज पाठवाल्याचा आरोप लावला होता. यानंतर वॉर्नला आॅस्ट्रेलियन टीमच्या उप-कणर्धारपदाहूनही काढण्यात आले होते. यानंतर त्याचे सिमोनाशी असलेले १० वर्षांचे नातेही तुटले.
मात्र वॉर्न तो वॉर्न. त्याची खोड काही जिरली नाही. त्यानंतरही २००६ मध्ये एमटीव्ही प्रेझेंटर कॉरेली इचोल्ट्ज आणि एम्मासह त्याचे न्यूड फोटो समोर आले होते. यानंतर वॉनर्चे नाव लिज हर्ले आणि ऐमिली स्कॉट यांच्यासह अनेक महिलांशीही जोडले गेले. तो सेक्स स्कँडलमध्येही अडकला होता. यामुळे त्याची वेळोवेळी फजितीच झाली नाही तर, पत्नीबरोबर डिव्हसर्देखील झाला. आता नवेच प्रकरण समोर आले. तो लंडनमध्ये एका कचराकुंडीशेजारी उभं राहून आपल्या ‘नव्या’ ‘गर्लफ्रेंड’ला किस करताना टिपला गेला आहे. ही नवी सुंदरी कोण? त्यालाच माहीत.