शहरं
Join us  
Trending Stories
1
नाराजीचा भूकंप! एकनाथ शिंदे वगळता शिंदेसेनेचे एकही मंत्री कॅबिनेट बैठकीला हजर नाहीत, कारण...
2
'हिंदुत्वा'वरून प्रकाश महाजन यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात; "राजकारणात भूमिका बदलल्या पाहिजेत, पण.."
3
"...तर मी कोणताही प्रश्न न विचारता राजकारणातून निवृत्ती होईन"; प्रशांत किशोरांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली
4
समजा अचानक समोर बिबट्या आलाच तर काय कराल? अशी घ्या खबरदारी
5
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
6
IND vs SA: गौतम गंभीर- शुममन गिल यांच्यात खेळपट्टीवरून मतभेद? मोठ्या पराभवानंतर चर्चांना उधाण!
7
बंगळूर मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी; ई-मेलमध्ये लिहिलेले कारण ऐकून अधिकारीही चक्रावले!
8
Armaan Malik : Video -"आधी तुझ्या मुलांना गोळ्या घालू, मग तुला..."; करोडपती युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी
9
तिच्या नखरेल अंदाजावरील गंभीरची कमेंट सगळ्यांना खटकली; पण गावसकरांना मात्र पटली! म्हणाले…
10
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
11
Supreme Court: सीबीआयचे तपास अधिकारी बोगस आहेत; सेवेत राहण्यायोग्यच नाहीत: सुप्रीम कोर्ट 
12
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
13
Bihar: शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी, पाटण्यातील गांधी मैदानात रोषणाई, थेट बंगळुरूहून मागवली फुले
14
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
15
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
16
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
17
Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!
18
खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
19
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
20
विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

'हाउसेस इन हॅम्पस्टेड'ची विक्रमी दराने विक्री; एफ. एन. सूझांच्या कलाकृतीची आजवरची सर्वोच्च किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:59 IST

गोमंतकीय सुप्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा यांच्या ‘हाउसेस इन हॅम्पस्टेड’ या निसर्गचित्राला लंडनमधील सोथेबीजच्या लिलावात तब्बल ७.५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे ६३ कोटी रुपये) इतकी किंमत मिळाली.

लंडन : गोमंतकीय सुप्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा यांच्या ‘हाउसेस इन हॅम्पस्टेड’ या निसर्गचित्राला लंडनमधील सोथेबीजच्या लिलावात तब्बल ७.५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे ६३ कोटी रुपये) इतकी किंमत मिळाली. ही रक्कम मूळ बोली लावलेल्या किमतीपेक्षा जवळपास सातपट अधिक असून, सूझांच्या कलाकृतीसाठीची ही आतापर्यंतची सर्वोच्च लिलाव किंमत ठरली आहे.

‘मॉडर्न अँड कंटेम्पररी साऊथ एशियन आर्ट’ या लिलावात सूझांचे दुसरे चित्र ‘एम्परर’ देखील तब्बल ६.९ दशलक्ष डॉलर्सना विकले गेले. यंदा लिलावासाठी ठेवलेल्या सूझांच्या पाचही चित्रांना मिळून १४.६ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किंमत मिळाली.

या कलाकारांच्या कलाकृतींचाही समावेशलिलावात वासुदेव गायतोंडे, एम. एफ. हुसेन, सैयद हैदर रझा, गणेश पाइन, जगदीश स्वामिनाथन आणि नारायण श्रीधर बेंद्रे यांच्या कलाकृतींचाही समावेश होता. एकूण लिलावातून २५.५ दशलक्ष डॉलर्स इतकी विक्रमी रक्कम जमा झाली.

३० वर्षांतील सर्वाेच्च कमाई सोथेबीजच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण आशियाई कलेच्या लिलावातील ही ३० वर्षांतील सर्वोच्च कमाई असून, सात  विक्रम झाले. हुसेन यांचे ‘चित्तोर किल्ला’ हे चित्र १.३ दशलक्ष डॉलर्सला विकले गेले, तर गणेश पाइन यांच्या ‘द ड्रीम काँव्हर्सेशन’ या चित्रालाही विक्रमी किंमत मिळाली.

महत्त्वाचे आकडे७.५  दशलक्ष डॉलर्स – सूझा यांच्या ‘हाउसेस इन हॅम्पस्टेड’ चित्राची किंमत६.९ दशलक्ष डॉलर्स – सूझा यांच्या ‘एम्परर’ चित्राची किंमत१४.६ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त – सूझा यांच्या पाच चित्रांची एकत्रित कमाई२५.५ दशलक्ष डॉलर्स – संपूर्ण लिलावातील एकूण रक्कम७ जागतिक विक्रम – यंदाच्या लिलावात प्रस्थापित

English
हिंदी सारांश
Web Title : F.N. Souza's 'Houses in Hampstead' sold for record price.

Web Summary : F.N. Souza's 'Houses in Hampstead' fetched $7.5 million at a London auction, a record for the artist. Another Souza painting, 'Emperor,' sold for $6.9 million. The auction, featuring other South Asian artists, totaled $25.5 million, marking a 30-year high for Sotheby's.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयpaintingचित्रकला