शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

घरासाठी तिने 20 बॉयफ्रेंड्सकडून घेतले 20 आयफोन-7

By admin | Updated: November 1, 2016 14:49 IST

घराचे डाऊन पेमेंट भरण्यासाठी पहिल्यांदा तिने 20 बॉयफ्रेंड्स पटवले. त्यानंतर या 20 बॉयफ्रेंड्सकडून प्रत्येकी एक महागडा आयफोन-7 गिफ्ट देण्याची मागणी केली.

 ऑनलाइन लोकमत

शेंझेन, (चीन) दि. 1 -  स्वतःच्या हक्काचे घर असावे, असे कुणाला वाटत नाही. स्वप्नातले घर प्रत्यक्षात साकार व्हावं, यासाठी प्रत्येक जण कर्ज काढून, कसा तरी आर्थिक डोलारा उभारतात.  मात्र चीनमधील शेंझेन शहरातील एका तरुणीने घराचे हफ्ते फेडण्यासाठी चातुर्याने आगळी-वेगळी शक्कल लढवली.  
 
शाओली असे या तरुणीचे टोपणनाव असून तिने घराचे डाऊन पेमेंट भरण्यासाठी पहिल्यांदा 20 बॉयफ्रेंड्स पटवले. त्यानंतर या 20 बॉयफ्रेंड्सकडून प्रत्येकी एक-एक महागडा आयफोन-7 गिफ्ट देण्याची मागणी केली. यानंतर तिने हे सर्व 'आयफोन्स टेक रिसायकलिंग साईट'वर प्रत्येकी  120,000  युआनला म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे 11 लाख 81 हजार 217 एवढ्या किंमतीला विकले. 
 
अशा पद्धतीने 20 'आयफोन-7' ची विक्री केल्यामुळे चीनसारख्या देशात स्वतःचं हक्काचे घर घेण्यासाठी शाओलीकडे अगदी सहजरित्या तेवढी रक्कम उपलब्ध झाली. 20 आयफोन-7 विकून तिने घराची डाऊन पेमेंट भरली. शाओलीने ही सर्व कहाणी घर प्रवेशावेळी आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगितली तेव्हा काही जण आश्चर्यचकीत झाले होते.  सोशल नेटवर्किंग साइट्सवर तर शाओलीची ही 'घर कहाणी' भलतीच व्हायरल झाली आहे. 
 
दरम्यान, या घटनेवर संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. कुणी तिच्या चातुर्याचे कौतुक करत आहेत, तर कुणी महागडा 'आयफोन 7' गिफ्ट करणा-या मुलांची फसवणूक केल्याप्रकरणी तिच्याविरोधात राग व्यक्त करत आहेत. 
गेल्या काही दिवसात, चीनमध्ये सोशल मीडियावर  हॅशटॅग '20 मोबाइल्स फोर अ हाऊस' (# 20 mobile for a house)  या ट्रेंड अंतर्गत शाओलीची स्टोरी चांगलीच व्हायरल  झाली आहे.
 
जिथे अनेकींना नशिबाने केवळ एक बॉयफ्रेंड मिळतो, तिथे शाओलीने तब्बल 20 बॉयफ्रेंड्स पटवले. फक्त पटवलेच नाही तर सहजासहजी न मिळणारा महागडा आयफोन्स-7 देखील त्यांच्याकडून गिफ्ट घेतला, शिवाय चतुर बुद्धीने 20 आयफोन्सची विक्री करुन स्वतःचे हक्काचे घरदेखील मिळवले.