अमेरिकेत हॉटेलमध्ये गोळीबार, १ ठार, ३ जखमी
By Admin | Updated: December 14, 2015 09:41 IST2015-12-14T09:41:17+5:302015-12-14T09:41:17+5:30
अमेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना सुरु असून, रविवारी रात्री लॉस एंजल्समधील एका हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबारात एका नागरीकाला आपले प्राण गमववावे लागले.

अमेरिकेत हॉटेलमध्ये गोळीबार, १ ठार, ३ जखमी
ऑनलाइन लोकमत
लॉस एंजल्स, दि. १४ - अमेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना सुरु असून, रविवारी रात्री लॉस एंजल्समधील एका हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबारात एका नागरीकाला आपले प्राण गमववावे लागले तर, तीन जण जखमी झाले. लॉस एंजल्सच्या स्टॅण्डर्ड फ्लॉवर स्ट्रीटवर हे हॉटेल असून, वादावादीतून गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबार करणारा हल्लेखोर अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. गोळीबारानंतर चौघांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यातील एकाचा मृत्यू झाला. तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.