रुग्णालयाला आग; सौदीत ३१ मृत्युमुखी
By Admin | Updated: December 25, 2015 00:51 IST2015-12-25T00:51:14+5:302015-12-25T00:51:14+5:30
सौदी अरेबियात एका रुग्णालयाला गुरुवारी पहाटे भीषण आग लागून ३१ जण मृत्युमुखी पडले, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिझान प्रांतात ही दुर्घटना घडली.

रुग्णालयाला आग; सौदीत ३१ मृत्युमुखी
रियाध : सौदी अरेबियात एका रुग्णालयाला गुरुवारी पहाटे भीषण आग लागून ३१ जण मृत्युमुखी पडले, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिझान प्रांतात ही दुर्घटना घडली.
आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही, असे सौदी नागरी संरक्षण विभागाचे प्रवक्ते मेजर याह्या बिन अब्दुल्ला अल-कुहातनी यांनी सांगितले. अतीवदक्षता कक्ष, प्रसूती आणि नवजात सुश्रूषा कक्षाजवळ सर्वप्रथम आग लागली आणि त्यानंतर तिने इतर भागाला विळखा घातला. सौदीला यावर्षी अनेक मोठ्या दुर्घटनांना सामोरे जावे लागले. मशिदीत अवजड क्रेन कोसळून १११ लोकांचा बळी जाणे, तसेच हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन २,४०० जणांना प्राणास मुकावे लागणे यावर्षीच्या या प्रमुख दुर्घटना आहेत.