सौदी अरेबियात रुग्णालयाला आग, २५ ठार, १०७ जखमी
By Admin | Updated: December 24, 2015 12:59 IST2015-12-24T12:59:52+5:302015-12-24T12:59:52+5:30
सौदी अरेबियातील जाझान जनरल रुग्णालयाला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली होती. या आगीमध्ये होरपळून २५ जणांचा मृत्यू झाला तर, १०७ जण जखमी झाले आहेत.

सौदी अरेबियात रुग्णालयाला आग, २५ ठार, १०७ जखमी
ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. २५ - सौदी अरेबियातील जाझान जनरल रुग्णालयाला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली होती. या आगीमध्ये होरपळून २५ जणांचा मृत्यू झाला तर, १०७ जण जखमी झाले आहेत.
रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील अतिदक्षता विभाग आणि प्रसूती कक्षामध्ये पहिल्यांदा आग भडकली आणि नंतर इतरत्र पसरली. जखमींना अन्य खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.