शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

भयंकर! ४०० प्रवाशांसह बोट नदीत उलटली, ५० जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:41 IST

Congo Boat Fire and Capsizes: कांगोमधील रस्त्यांची अवस्था बिकट असल्यामुळे लोक नद्यांमधून लाकडी बोटींनी प्रवास करतात.

आफ्रिकेतील देश कांगो देशात मंगळवारी रात्री प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली. या दुर्घटनेत ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास १०० लोक बेपत्ता झाले आहेत. पोलिसांकडून बेपत्ता झालेल्या लोकांना शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार,  एचबी कोंगोलो नावाची बोट माटनकुमु बंदरातून बोलोम्बा क्षेत्रासाठी निघाली होती. परंतु, म्बांडाका शहराजवळ अचानक बोटीला आग लागली. एक महिला जेवण बनवत असताना आग लागल्याचे सांगण्यात आले. आगीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी अनेकांनी नदीत उड्या घेतल्या. या दुर्घटनेत ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास १०० लोक बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, आगीत होरपळून जखमी झालेल्या आणि दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. 

बेपत्ता लोकांचा शोध सुरूकॉम्पेटेंट लोयोको यांनी 'असोसिएटेड प्रेस' या वृत्तसंस्थेला सांगितले की, या दुर्घटनेत वाचलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तर, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवळपास १०० लोक अजूनही बेपत्ता आहेत. अद्यापही त्यांचा ठावठिकाणा कळलेला नसून शोध मोहीम राबवली जात आहे.

बोट अपघाताचे प्रमाण वाढलेकांगोमधील रस्त्यांची अवस्था बिकट आहे, ज्यामुळे लोक नद्यांमधून लाकडी बोटींनी प्रवास करतात. या बोटी बर्‍याचदा जास्त प्रमाणात भरल्या जातात, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. गेल्या काही वर्षांत अशा अनेक अपघातांमध्ये शेकडो लोकांचा जीव गमावला आहे. डिसेंबरमध्ये ३८ लोक उत्तर-पूर्व कांगोमध्ये ख्रिसमससाठी प्रवास करीत असताना बोट अपघातात ठार झाले. तर, ऑक्टोबरमध्ये किवू लेक येथे दुसर्‍या अपघातात ७८ लोकांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयAccidentअपघात