सिलिकॉन व्हॅली दौऱ्याविषयी आशा

By Admin | Updated: September 25, 2015 00:22 IST2015-09-25T00:22:24+5:302015-09-25T00:22:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॅलिफोर्नियाचा (सिलिकॉन व्हॅली) दौरा नवनिर्मिती आणि उद्यमशीलतेच्या संस्कृतीत नवा अध्याय जोडणारा ठरेल

Hope about Silicon Valley tour | सिलिकॉन व्हॅली दौऱ्याविषयी आशा

सिलिकॉन व्हॅली दौऱ्याविषयी आशा

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॅलिफोर्नियाचा (सिलिकॉन व्हॅली) दौरा नवनिर्मिती आणि उद्यमशीलतेच्या संस्कृतीत नवा अध्याय जोडणारा ठरेल, असे मत अमेरिकन संसद सदस्यांच्या द्विदलीय गटाने व्यक्त केले आहे. मोदी यांचा हा दुसरा दौरा भारतीय गुंतवणूक आकर्षित करण्यास हातभार लावील, अशी या गटाला आशा आहे.
मोदींच्या सिलीकॉन व्हॅली दौऱ्याबद्दल उत्सुकता दाखविताना काँग्रेसच्या या सदस्यांनी हा दौरा अमेरिकन तंत्रज्ञान उद्योगात भारतीयांचे आणि भारतीय अमेरिकनांचे योगदान किती हे दर्शवील, असे म्हटले. (वृत्तसंस्था)

Web Title: Hope about Silicon Valley tour