हाँगकाँग; निदर्शक काही अडथळे बाजूला काढणार
By Admin | Updated: October 6, 2014 00:15 IST2014-10-06T00:15:23+5:302014-10-06T00:15:23+5:30
आठवड्यापासून सरकारी मुख्यालयाचे रस्ते अडवून ठेवलेल्या लोकशाहीवादी निदर्शकांनी काही अडथळे बाजूला घेण्याचे रविवारी मान्य केले

हाँगकाँग; निदर्शक काही अडथळे बाजूला काढणार
हाँगकाँग : आठवड्यापासून सरकारी मुख्यालयाचे रस्ते अडवून ठेवलेल्या लोकशाहीवादी निदर्शकांनी काही अडथळे बाजूला घेण्याचे रविवारी मान्य केले. लोकशाहीवादी विद्यार्थ्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराला अडविणारे काही अडथळे काढून घेण्याची तयारी दर्शविली आहे.
अनेक निदर्शक अजूनही त्याच भागात ठाण मांडून बसले असल्यामुळे निर्माण झालेला पेचप्रसंग प्रशासनाला मिळालेल्या या ताज्या सवलतीमुळे किती प्रमाणात दूर होईल हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. अडथळे काही प्रमाणात काढून घेण्याचा उपाय हा शहराच्या अन्य भागात निदर्शकांना एकत्रित होण्याची संधी देण्यासाठी असावा असेही बोलले जात आहे. निदर्शकांचे काही प्रतिनिधी हे पोलिसांशी हस्तांदोलन करून काही अडथळे दूर करीत असल्याचे टीव्ही फुटेजमध्ये दिसले. (वृत्तसंस्था)