मधमाशीने विमान आणले जमिनीवर
By Admin | Updated: June 9, 2015 00:14 IST2015-06-09T00:14:36+5:302015-06-09T00:14:36+5:30
साऊथम्पटन येथून डब्लिनला जाणाऱ्या विमानाला अनपेक्षित प्रवाशामुळे आपत्कालीन स्थितीत उतरावे लागले. वैमानिकाला घाम फोडणारा हा प्रवासी एखादा अतिरेकी नव्हता, तर ती होती एक मधमाशी.

मधमाशीने विमान आणले जमिनीवर
लंडन : साऊथम्पटन येथून डब्लिनला जाणाऱ्या विमानाला अनपेक्षित प्रवाशामुळे आपत्कालीन स्थितीत उतरावे लागले. वैमानिकाला घाम फोडणारा हा प्रवासी एखादा अतिरेकी नव्हता, तर ती होती एक मधमाशी.
त्याचे झाले असे की, फ्लायबे उड्डयन कंपनीच्या विमानाद्वारे काही डझन प्रवासी साऊथम्पटन येथून डब्लिन येथे जात होते. रस्त्यात तांत्रिक समस्येचा संशय आल्याने चालकाने विमान नजीकच्या विमानतळावर उतरविण्याचा निर्णय घेतला.
विमान उतरल्यानंतर अभियंत्यांनी तांत्रिक समस्येचा स्रोत शोधण्यासाठी तपासणी केली. तेव्हा विमानाच्या मागील भागात त्यांना पिवळ्या आणि काळ्या रंगाचा एक कीटक (मधमाशी) आढळून आला. या संकटाला मधमाशी कारणीभूत असल्याचे फ्लायबेच्या अभियंत्यांनी सांगितले.विमानामध्ये तांत्रिक दोष निर्माण होण्याच्या गडबडीत या मधमाशीचा मृत्यू झाला होता. (वृत्तसंस्था)
-----------
या संकटामुळे विमानाला नियोजित ठिकाणी पोहोचण्यास दोन तास विलंब झाला.कीटक ठरू शकतात घातक कीटक विमानाला गंभीर समस्या उत्पन्न करू शकतात. १९९६ मध्ये हवाई वेग मोजणाऱ्या यंत्रणेत गांधीलमाशी अडकून बसल्यामुळे विमान कोसळून १८९ प्रवासी ठार झाले होते. १९८० मध्येही गांधीलमाशीमुळे अशीच दुर्घटना होऊन विमान अटलांटिक समुद्रात कोसळले होते. यात ३४ जण ठार झाले होते. (वृत्तसंस्था)