सायकली उजळविणार ग्रामीण भारतातील घरे
By Admin | Updated: October 15, 2015 00:41 IST2015-10-14T23:36:12+5:302015-10-15T00:41:31+5:30
भारतीय वंशाच्या एका अब्जाधीशांनी भारतात दहा हजार सायकली वितरित करण्याची योजना आखली आहे. अर्थात या सायकली सामान्य नसून वीज निर्माण करणाऱ्या आहेत

सायकली उजळविणार ग्रामीण भारतातील घरे
ह्यूस्टन : भारतीय वंशाच्या एका अब्जाधीशांनी भारतात दहा हजार सायकली वितरित करण्याची योजना आखली आहे. अर्थात या सायकली सामान्य नसून वीज निर्माण करणाऱ्या आहेत. या माध्यमातून घराघरांत झगमगाट करण्याचा त्यांचा मानस आहे.
मिशिगन येथील अनिवासी भारतीय मनोज भार्गव यांचे कुटुंब १९६७ मध्ये अमेरिकेत गेले होते. याबाबत बोलताना मनोज भार्गव म्हणाले की, उत्तराखंडात १५ ते २० गावात प्रायोगिक तत्त्वावर अशा ५० सायकलींचे वितरण करण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)
>यासंदर्भात माहिती देताना भार्गव म्हणाले की, ही सायकल उभी असल्यानंतर केवळ एक तास पँडलिंग करून दिवसभरासाठी लागणारी विज निर्माण करता येईल.
>गावातील नागरिकांनी एकत्र येऊन सायकलींसाठी जास्त बॅटऱ्या खरेदी केल्या, तर अनेक घरांत वीज उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.