ट्रम्प यांच्या झंझावाताने हॉलीवूड सेलीब्रिटी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 05:19 IST2016-11-10T05:19:37+5:302016-11-10T05:19:37+5:30

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अब्जाधीश व्यावसायिक डोनाल्ड ट्रम्प आणि अनुभवी नेत्या हिलरी क्लिंटन यांच्यातील अटीतटीच्या लढतीत ट्रम्प यांचा विजय झाल्यामुळे

Hollywood celebrity Haren by trump storms | ट्रम्प यांच्या झंझावाताने हॉलीवूड सेलीब्रिटी हैराण

ट्रम्प यांच्या झंझावाताने हॉलीवूड सेलीब्रिटी हैराण

लॉस एंजल्स : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अब्जाधीश व्यावसायिक डोनाल्ड ट्रम्प आणि अनुभवी नेत्या हिलरी क्लिंटन यांच्यातील अटीतटीच्या लढतीत ट्रम्प यांचा विजय झाल्यामुळे हॉलीवूडमधील अनेक सेलीब्रिटी हैराण आहेत. ‘द अ‍ॅप्रेन्टिस’चे सूत्रसंचालन करणारे माजी रिअ‍ॅलिटी स्टार ट्रम्प यांनी फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलिना आणि ओहियो यासारख्या राज्यांत हिलरींना पराभवाची धूळ चारली. अनेक सेलीब्रिटींनी उघडपणे हिलरींना पाठिंबा दिला होता. आता ते सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त करीत आहेत. ‘द बिग बँग थिअरी’चा स्टार भारतीय अमेरिकी कलावंत कुणाल नय्यर याचाही
या सेलीब्रिटींत समावेश आहे. ‘या देशात १५ वर्षांपासून राहत असून, यापूर्वी मी एवढा भयभीत कधीच नव्हतो’, असे कुणालने लिहिले आहे.
प्रसिद्ध गायिका चेर हिने टिष्ट्वट केले की, ‘जग असे राहणार नाही. मला युवा पिढीबाबत दु:ख वाटते. अभिनेत्री जेसिका कॅस्टेनने म्हटले आहे की, ‘आमच्याकडे वंशवाद आणि लिंगभेद नाही, असा दावा आता यापुढे आम्हाला करता येणार नाही. आता आम्ही काय करावे हा प्रश्न आहे.’ ‘हे भीतीदायक असून माझ्या डोळ्यांत अश्रू आहेत, असे पॉप स्टार अरियाना ग्रान्डेने म्हटले आहे.

Web Title: Hollywood celebrity Haren by trump storms