शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

पाकिस्तानच्या सिंधमध्ये एचआयव्हीचा उद्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 05:01 IST

पाकिस्तान सरकारने सिंध प्रांतात नुकत्याच एचआयव्हीच्या झालेल्या उद्रेकाची चौकशी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडे (डब्ल्यूएचओ-हू) मदत मागितली आहे.

कराची : पाकिस्तान सरकारने सिंध प्रांतात नुकत्याच एचआयव्हीच्या झालेल्या उद्रेकाची चौकशी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडे (डब्ल्यूएचओ-हू) मदत मागितली आहे.एचआयव्हीची बाधा ६०० पेक्षा जास्त जणांना झाली असून, त्यात बहुसंख्य मुले आहेत, असे प्रसारमाध्यमांनी म्हटले. देशाच्या वायव्येकडील लारकाना जिल्ह्यातील रातोदेरो गावात २१,३७५ जणांची तपासणी करण्यात आली त्यात ६८१ एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. यापैकी ५३७ जण हे दोन ते १५ वयोगटातील आहेत.एचआयव्हीची बाधा झाल्याचे कारण आरोग्य अधिकाऱ्यांनी अस्वच्छ उपकरणांचा वापर, असुरक्षितरीत्या एकाचे रक्त दुसºयाला देणे आणि भोंदू डॉक्टरांकडून होणारे बेसुमार गैरप्रकार असल्याचे सांगितले. जागतिक आरोग्य संघटना आणि रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्रांची १० जणांची तुकडी काही दिवसांत येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.त्यानंतरच रातोदेरोतील या उद्रेकाचे नेमके कारण समजेल, असे पंतप्रधानांचे विशेष सहायक (राष्ट्रीय आरोग्य सेवा) जफर मिर्झा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)>काय आहेत कारणे?अमेरिकेत सीडीसी ही सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आघाडीची संस्था असून, ती पाकिस्तानात अनेक सार्वजनिक आरोग्य संस्थांसोबत काम करते. एचआयव्हीची बाधा छाननी न केलेले रक्त व्यक्तीला देणे किंवा बाधित सिरिंजेसचा वापर (अनारोग्यकारी परिस्थितीत सिरिंजेसचा फेरवापर करणे किंवा त्या पुन्हा डब्यात भरणे हे तेथे नेहमीचे आहे) केल्यामुळे झाली, असे आम्ही गृहीत धरले आहे. तिसरे कारण म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध असू शकते, असे मिर्झा म्हणाले.आपल्या रुग्णांना विषाणू (व्हायरस) देत असल्याबद्दल पोलिसांनी गेल्या महिन्यात एका डॉक्टरला अटक केली होती. जिल्ह्यात १७ भोंदू डॉक्टरांनाही ताब्यात घेऊन त्यांचे दवाखाने सील केले गेले होते.