ह्युस्टनमध्ये महाभयंकर पूर, आपत्ती निवारण विभागाकडून ऐतिहासिक पावसाची नोंद
By Admin | Updated: April 20, 2016 16:31 IST2016-04-20T16:31:26+5:302016-04-20T16:31:26+5:30
ह्युस्टन शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

ह्युस्टनमध्ये महाभयंकर पूर, आपत्ती निवारण विभागाकडून ऐतिहासिक पावसाची नोंद
ऑनलाइन लोकमत
अमेरिका, दि. 20- ह्युस्टन शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ह्युस्टनमध्ये सोमवारी 44.7 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. ही नोंद ऐतिहासिक असल्याचंही आपत्ती निवारण विभागानं म्हटलं आहे. टेक्सासच्या गव्हर्नरनं ह्युस्टनमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. 70,000 हजार लोकांनी वीज नसल्यानं शहर सोडलं आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरातून जवळपास 1200 लोकांनी वाचवण्यात यश आलं आहे. या पूर परिस्थितीमुळे ह्युस्टन शहराचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. या पुरात अनेक प्राणी वाहून गेल्याची माहिती समोर येते आहे. सरकारनं लहान मुलांना पाण्यात खेळण्यासही मज्जाव केला आहे. या पूरस्थितीमुळे अनेक जण प्रभावित झाले आहेत.