शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

१३ वर्षांनंतर गाजरात सापडली हि-याची अंगठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:13 AM

टोरँटो (कॅनडा) : अत्यंत आवडती, पण हरविलेली हि-याची अंगठी सापडल्यावर महिलांना जो आनंद होतो तो मेरी ग्राम्स यांना मिळाला. २००४मध्ये अल्बर्टातील आपल्या स्वत:च्या शेतात मेरी यांची ही हिºयाची अंगठी हरवली होती. ती सापडत नसल्याचे फक्त मेरीच्या मुलालाच माहीत होते. १४ आॅगस्ट रोजी मेरी यांची सून डेले त्यांच्या शेतातून गाजर काढत ...

टोरँटो (कॅनडा) : अत्यंत आवडती, पण हरविलेली हि-याची अंगठी सापडल्यावर महिलांना जो आनंद होतो तो मेरी ग्राम्स यांना मिळाला. २००४मध्ये अल्बर्टातील आपल्या स्वत:च्या शेतात मेरी यांची ही हिºयाची अंगठी हरवली होती. ती सापडत नसल्याचे फक्त मेरीच्या मुलालाच माहीत होते. १४ आॅगस्ट रोजी मेरी यांची सून डेले त्यांच्या शेतातून गाजर काढत होती. तिला गाजरासोबत अंगठी त्यात फसल्याचे दिसले. जमिनीखाली पुरलेल्या अंगठीतून गाजर वाढलेले दिसले. त्यामुळे गाजरासोबत अंगठीही जमिनीबाहेर आली. अंगठी हरविल्याचे मेरीने नवºयाला वाईट वाटेल, म्हणून सांगितले नव्हते. दरम्यान, मेरीने अंगठी हरविल्याचे जाहीर होऊ नये, म्हणून स्वस्तातील अंगठी बनवून घेतली होती. डेले हिने गाजर धुतल्यावर ती हिºयाची अंगठी असल्याचे स्पष्ट झाले. मेरीच्या मुलाने अंगठी बघताच, ती आपल्या आईची असू शकते, असे म्हटले व आईला तसे सांगितले. अंगठी हरविल्याचे मी नवºयापासून लपवून ठेवायला नको होते, असे मेरी ग्राम्स म्हणाल्या. २००५ मध्ये मेरीच्या नवºयाचा मृत्यू झाला.