बांगलादेशात हिंदू पुजाऱ्याची हत्या

By Admin | Updated: June 8, 2016 03:13 IST2016-06-08T03:13:19+5:302016-06-08T03:13:19+5:30

बांगलादेशात इस्लामिक स्टेटच्या तीन जिहादींनी बुधवारी एका वृद्ध हिंदू पुजाऱ्याची हत्या केली.

Hindu priest's death in Bangladesh | बांगलादेशात हिंदू पुजाऱ्याची हत्या

बांगलादेशात हिंदू पुजाऱ्याची हत्या


ढाका : बांगलादेशात इस्लामिक स्टेटच्या तीन जिहादींनी बुधवारी एका वृद्ध हिंदू पुजाऱ्याची हत्या केली. बांगलादेशात अल्पसंख्याक व धर्मनिरपेक्ष कार्यकर्त्यांवर दहशतवादी हल्ल्याची ही ताजी तर पुजाऱ्याच्या हत्येची या वर्षीची दुसरी घटना आहे.
झिनाईगाह जिल्ह्याच्या नोलगांडा गावात पुजारी आनंदा गांगुली सकाळी सायकलवरून मंदिरात जात होते. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरला.
जिल्ह्याचे पोलीसप्रमुख अल्ताफ हुसैन यांनी सांगितले की, हल्ल्याची पद्धत पाहता हे दहशतवाद्यांचेच कृत्य वाटते. दहशतवाद्यांनी यापूर्वीही असे हल्ले केले आहेत. गांगुली यांची गावापलीकडे ओळख नव्हती. त्यांचे कोणाशी वैर असल्याचेही संकेत नाहीत. त्यामुळे यात दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय असून आम्ही चौकशी सुरू केली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Hindu priest's death in Bangladesh