शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 18:55 IST

Hindu in Bangladesh: या घटनेनंतर देशभरात विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्षणे केली.

Hindu in Bangladesh: बांग्लादेशात शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर मोहम्मद युनूस यांचे सरकार आले. तेव्हापासून सातत्याने हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. आता राजधानी ढाका येथे हिंदू व्यावसायिक लाल चंद सोहाग यांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर हल्लेखोर मृतदेहावर नाचले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभर संतापाची लाट पसरली आहे. 

खंडणीसाठी हत्यामिळालेल्या माहितीनुसार, ढाका येथील मिटफोर्ड हॉस्पिटलमधील सर सलीमुल्ला मेडिकल कॉलेजसमोर बुधवारी (९ जुलै) भयानक हत्या घडली. सोहाग 'सोहाना मेटल' नावाचे भंगाराचे दुकान चालवायचे. व्यवसाय चांगला चालत होता, त्यामुळेच परिसरातील महमूदुल हसन मोहिन आणि सरवर हुसेन टीटू यांनी त्यांच्या व्यवसायात ५० टक्के हिस्सा किंवा खंडणीची मागणी केली. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आरोपी खंडणीसाठी सोहाग यांना त्रास देत होते.

हत्येचा व्हिडिओ व्हायरल आरोपींनी बुधवारी सोहाग यांना एकटे गाठले अन् चार-पाच साथीदारांच्या मदतीने त्यांच्यावर हल्ला केला. सोहाग यांना नग्न करुन दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर मार लागला. या मारहाणीत सोहाग यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेदरम्यान, परिसरातील लोकांनी बघ्यांची भूमिका घेतली. भीतीपोटी कोणीही आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या हत्येचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

विद्यार्थ्यांनी रस्त्यावर निदर्शने केलीढाकामधील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी शनिवारी या घटनेचा निषेध केला. ब्रॅक विद्यापीठ, ईस्ट वेस्ट विद्यापीठ, एनएसयू आणि सरकारी ईडन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली, तर व्हिडिओ व्हायरल होताच ढाका विद्यापीठ आणि जगन्नाथ विद्यापीठात निदर्शने सुरू झाली. 

पोलिसांची कारवाई, ७ आरोपींना अटकढाका पोलिसांनी हत्येप्रकरणी ७ जणांना अटक केली आहे, त्यापैकी दोघांकडे बेकायदेशीर शस्त्रे देखील आढळली. लाल चंद यांची बहीण मंजुआरा बेगम (४२) हिने कोतवाली पोलिस ठाण्यात हत्येची तक्रार दिली, ज्यात १९ जणांची नावे आहेत. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूIndiaभारतCrime Newsगुन्हेगारी