अमेरिकेत हिंदूंचा गट रिपब्लिकन्सच्या मदतीला
By Admin | Updated: September 20, 2015 22:34 IST2015-09-20T22:27:37+5:302015-09-20T22:34:10+5:30
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी अनेक पुराणमतवादी भारतीय अमेरिकनांनी आपला गट स्थापन केला आहे.

अमेरिकेत हिंदूंचा गट रिपब्लिकन्सच्या मदतीला
शिकागो : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी अनेक पुराणमतवादी भारतीय अमेरिकनांनी आपला गट स्थापन केला आहे. इतिहासात हा काळ खूप महत्त्वाचा असल्याचे या गटाचे म्हणणे आहे.
या गटाचे नाव रिपब्लिकन हिंदू कोएलिशन (आरएचसी) असून, त्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सभागृहाचे माजी अध्यक्ष न्यूट गिनरिच यांनी घेण्याची तयारी दाखविली आहे. भारतीय अमेरिकनांवर लक्ष केंद्रित करणे, मर्यादित सरकार व खुली बाजारपेठ, अशी या गटाची विचारसरणी आहे. (वृत्तसंस्था)