पाकिस्तानमधील हिंदू सरन्यायाधीश भगवानदास कालवश
By Admin | Updated: February 24, 2015 23:20 IST2015-02-24T23:20:13+5:302015-02-24T23:20:13+5:30
पाकिस्तानचे माजी प्रभारी सरन्यायाधीश राणा भगवानदास यांचे येथे सोमवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७३ वर्षांचे होते.

पाकिस्तानमधील हिंदू सरन्यायाधीश भगवानदास कालवश
कराची : पाकिस्तानचे माजी प्रभारी सरन्यायाधीश राणा भगवानदास यांचे येथे सोमवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७३ वर्षांचे होते.
येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना काल त्यांची प्राणज्योत मालवली. भगवानदास पाकचे सरन्यायाधीशपद भूषविणारे पहिले हिंदू व दुसरे बिगर मुस्लिम न्यायाधीश होते. ते देशाच्या न्यायव्यवस्थेतील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. २००७ च्या न्यायिक संकटादरम्यान तेच प्रभारी सरन्यायाधीश होते. ते फेब्रुवारी २००० पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सेवा करीत होते.